mega block

मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक रद्द

 

मुंबई : मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं आज मध्यरात्री करण्यात येणारे काम रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अनेक गाड्या रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाचे काम करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. 

Jun 6, 2015, 08:09 PM IST

24, 25 आणि 26 जानेवारीला मेट्रो रेल्वेचा मेगाब्लॉक

 घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो रेल्वमार्गावर येत्या 24, 25 आणि 26  जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत मेट्रोची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

Jan 22, 2015, 08:20 PM IST

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट

पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.

Jan 9, 2015, 05:29 PM IST

सावधान, आज रात्रीपासून ‘मध्य रेल्वे’चा प्रवास टाळा!

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी... आज रात्रीपासूनच रविवारी सकाळपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री मध्य रेल्वेवर प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय. 

Dec 20, 2014, 09:26 AM IST

लोकलचा आज मेगाब्लॉक, पाहा कधी, कुठे?

आज रविवार आणि मेगा ब्लॉक असल्याने मुंबई आणि उपनगरांत तुम्हाला कुठंही जायचं असेल, तर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार  आहे.

Oct 26, 2014, 10:35 AM IST

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.

Jul 27, 2014, 09:10 AM IST

प्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!

प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.

Jan 25, 2014, 10:19 PM IST

पश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक

गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रात्री प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांना रात्रीच्या कामामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. नायगांव इथे सब-वेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे.

Feb 7, 2013, 10:19 PM IST

पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक
घेण्यात येणार आहे.

Feb 5, 2012, 09:04 AM IST