नाशिकमध्ये तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं
नाशिक शहरात तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरु आहे.
Apr 15, 2013, 11:09 PM ISTकार्यकर्त्यांसमोर गळा काढणारे आव्हाड आज रस्त्यावर...
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात मुंब्र्यात बंद पुकारण्यात आलाय. बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवतोय.
Apr 12, 2013, 01:18 PM ISTअनधिकृत बांधकामांना झटका, पण राजकीय पक्षांची सुटका!
पुणे शहरात हजारोंच्या संख्येनं अनधिकृत बांधकामं असल्याचे स्पष्ट झालंय. महापालिकेकडील आकडेवारीवरूनच ही माहिती उघड झाली आहे. महापालिका हद्दीत २ हजार ६०० अनधिकृत बांधकामं आहेत. यातील शेकडो बांधकामांवर महापालिकेनं कारवाईदेखील केली आहे. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे यात एकही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या कार्यालयाचा समावेश नाही.
Feb 19, 2013, 09:02 PM ISTवाय पी सिंग यांचे अमिताभ-जया बच्चनवर गंभीर आरोप
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्या कंपनीकडून मुंबईत बेकायदेशीर कमर्शियल बिल्डिंग बांधली जात असल्याचा आरोप वाय. पी. सिंह यांनी केला आहे.
Jan 30, 2013, 04:50 PM ISTअनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत एकाचा बळी
पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा पहिला बळी गेलाय. वाल्हेकर वाडीत कारवाई दरम्यान घर पडल्यानं कैलास डिसले यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.
Aug 23, 2012, 02:49 PM ISTअतिक्रमण : नागरिकांचं की पालिकेचं?
पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात सुरु असलेल्या कारवाईला शनिवारी हिंसक वळण लागलं. तळवडे भागात संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तर त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला.
Aug 19, 2012, 08:50 AM ISTदादा, इथं काय कारवाई करणार?
‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय. बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.
Jul 11, 2012, 01:26 PM ISTमंत्रालयावरच अनधिकृत बांधकाम...
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर झालेलं अनधिकृत बांधकाम उजेडात आलं आहे. मंत्रालयातील पहिल्या ते सहाव्या मजल्यावर मंत्र्यांची दालनं नियमबाह्यरितीने सजवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालयाचा सातवा मजला पूर्णपणे अनधिकृत असल्याचं सरकारनंच स्पष्ट केलंय.
Jun 27, 2012, 08:33 AM ISTरत्नागिरी: बेकायदा जमिनीवर बांधकामाची 'कृपा'
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहांचे घोटाळ्यामागून घोटाळे उघड होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाडापेठ गावात कृपांच्या नातेवाईकांनी कशाप्रकारे जमीन लाटली होती. आता त्या लाटलेल्या जमीनवर बेकायदा बांधकाम झाल्याचं उघड झालं आहे.
Mar 20, 2012, 04:59 PM IST'कल्याणमध्ये अनधिकृत बांधकाम वाढतयं' - महापौर
अनधिकृत बांधकामाचा विळखा कल्याणला फार झपाट्याने पडतो आहे. आणि ही बांधकाम करण्यामध्ये स्थानिक राजकारण्याचाच सहभाग असल्याची कबुली दिली आहे, खुद्द कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती घोलप यांनी. घोलप यांनी या प्रकरणी स्थानिक आमदाराचाही वरदहस्त असल्याचा आरोप करत खळबळ माजवून दिली आहे.
Jan 2, 2012, 10:49 AM IST'विघ्नहर सोसायटी'वर विघ्न
नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील विघ्नहर इमारतीचं अनधिकृत बांधकाम करुन फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रत्यक्ष मंजूर आराखड्यापेक्षा २० ते ४० टक्के बांधकाम करण्यात आलंय.
Dec 8, 2011, 02:58 AM IST