Deepak Hooda चा शानदार सिक्स, अन् Ravi Shastri थोडक्यात बचावले,पाहा VIDEO

दीपक हुडाने ठोकलेल्या एका सिक्सने मोठा अपघात होता होता टळलाय. 

Updated: Jul 8, 2022, 03:58 PM IST
 Deepak Hooda चा शानदार सिक्स, अन् Ravi Shastri थोडक्यात बचावले,पाहा VIDEO

मुंबई : इंग्लंडविरूद्ध पहिला टी20 सामना टीम इंडियाने 50 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाची बॉलिंग आणि बॅटिंग चांगलीच चालली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 198 धावा ठोकल्या. या धावा करताना दीपक हुडाने ठोकलेल्या एका सिक्सने मोठा अपघात होता होता टळलाय. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.  

रोहित शर्मा (24) धावांवर बाद झाल्यानंतर हुड्डा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. दीपकने पहिल्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही. पण, पुढच्या दोन चेंडूंवर त्याने दोन सिक्स ठोकले. गोलंदाज मोईन अलीला त्याने हे सिक्स ठोकले. 

मोईन अली पाचवी ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर दीपकने लाँग ऑनवर षटकार ठोकला. चेंडू थेट स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गेला. त्यावेळी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इंग्लंडचा माजी कर्णधार माइक अर्थ्टन कॉमेंट्री करत होते. चेंडू त्यांच्या दिशेने येताना पाहून दोघेही मागे सरसावले. जर ते मागे गेले नसते तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र थोडक्यात हा अपघात टळला. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

दरम्यान हुडाने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्येही शानदार फलंदाजी केली. मोठी खेळी खेळतानाही तो हुकला. पण, त्याने 17 चेंडूत 33 धावा करत मोलाची भूमिका बजावली.