Chhaava Box Office Collection Day 10: विकी कौशलचा छावा चित्रपटाने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने 10 दिवसांतच 400 कोटींचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांनी विकीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून या आठवड्यातदेखील छावाची घोडदौड सुरूच राहणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली आहे, जाणून घेऊया सविस्तर.
सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने 10व्या दिवसांतच 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 326.75 कोटी कमावले आहेत. छावा 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केलेला टॉप -10 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत पुष्पा-2, जवान, पठाण, अॅनिमल, गदर-2, स्त्री-2, बाहुबली-2 या सारख्या सिनेमांची नावे आहेत.
पहिल्याच दिवशी सिनेमाने 31 कोटींचे कलेक्शन करत ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 37 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 48 कोटींचे कलेक्शन केले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी 24 कोटी कमावले होते. पाचव्या दिवशी 25.25 कोटी, सहाव्या दिवशी 32 कोटी आणि सातव्या दिवशी 21.5 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे पहिल्याच आठवड्यात एकूण कलेक्शन 219.25 कोटी इतके झाले आहेत. तर, आठव्या दिवशी चित्रपटाने 23.5 कोटी आणि नवव्या दिवशी 44 कोटींचे कलेक्शन करत इतिहास रचला होता. भारतात छावाने 326 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा गल्ला जमावला आहे
300 कोटींच्या कमाईबरोबरच छावा विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. याआधी त्याचा उरी या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 245.36 कोटींचे कलेक्शन केले होते. तर, विकीचा सॅम बहादूर सिनेमाने 92.98 कोटींची कमाई केली होती. तर, जरा हटके जरा बचके सिनेमाने 88 कोटींची कमाई करत हिट ठरली होती. तर, राजीने 123.84 कोटींच्या कमाईबरोबरच सुपरहिट ठरली होती. .
सध्या छावा या चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या लढाई आणि औरंगजेबाने त्यांचे केलेले हाल याबद्दलचा इतिहास मांडण्यात आला आहे. यात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असे दाखवण्यात आले आहे. आता यावरुन गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपक शिर्के यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे, असा आरोप केला आहे.