1/12

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी ट्विंकल खन्ना हिनं आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. १५ हून अधिक सिनेमांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर ट्विंकलनं अक्षय कुमारशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००१ साली ट्विंकल आणि अक्षयनं लग्न केलं त्यानंतर मात्र तिनं सिनेमांना टाटा बाय बाय केलं...
2/12

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर याच्या एन्ट्रीनंतर आता इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी त्यांची मुलगी कृष्णाही तयार आहे. पण, सध्या तिचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. तर सध्या ती चर्चेत आहे आपलं प्रेम उघडउघडपणे व्यक्त करण्यासाठी... कृष्णानं नुकतेच तिच्या बॉयफ्रेंड स्पेन्सर जॉनसन याच्यासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
3/12

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओलही आपल्या आईप्रमाणे उत्तम डान्सर आहे. तिची बॉलिवूडमध्ये फारशी छाप उमटली नसली तरी ‘धूम’ सिनेमातलं टायटल सॉन्ग ईशामुळे लोकांच्या आजही लक्षात आहे, हे विसरता येणार नाही. २००२ साली आलेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ या सिनेमातून ईशानं सिल्व्हर स्क्रीनवर एन्ट्री घेतली होती. नुकतंच, ईशा विवाहबद्धही झालीय. सध्या ती आपलं वैवाहिक आयुष्य जास्त एन्जॉय करतेय.
4/12

अन्ना सुनील शेट्टीही आपली मुलगी अथिया हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करायला तयार आहे. पण, ट्विस्ट म्हणजे अथियाच्या करिअर सलमान खानच्या हातात आहे. सलमान सध्या सुभाष घई यांचा सुपरहिट सिनेमा ‘हिरो’च्या प्रोडक्शनमध्ये बिझी आहेत. या सिनेमातून ते आदित्य पंचोली याचा मुलगा सूरज पंचोली आणि सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी यांना इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करणार आहे.
5/12

6/12

7/12

8/12

9/12

10/12

‘खामोश’... केवळ एकच शब्द उच्चारताच आणखी काही बोलण्याची गरजच नसते... अशा शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा तर लकी गर्ल ठरतेय... सोनाक्षीच्या अनेक सिनेमांनी १०० करोड क्लबमध्ये सहज एन्ट्री मिळवली. दबंग खान सोबत ‘दबंग’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी सोनाक्षी लवकरच अजय देवगणसोबत ‘अॅक्शन जॅक्सन’मध्ये तर रजनीकांतसोबत ‘लिंगा’मध्ये दिसणार आहे.
11/12

बॉलिवूडचा ‘क्राईम मास्टर गोगो’ आणि त्याची मुलगी श्रद्धा कपूर... ‘आशिकी २’ किंवा ‘एक व्हिलन’सारख्या चित्रपटांतून धमाकेदारपणे लोकांसमोर येणारी श्रद्धा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. ‘उंगली’ सिनेमातलं नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणंही सध्या खूप चर्चेत आहे. श्रद्धाला आपल्या वडिलांसोबतही सिनेमात काम करायचंय.
12/12
