Photos: दिवसाला 45 डायपर, 15 किलो दूध अन्... एकाच वेळी 9 बाळांना जन्म देणारी आई म्हणते, 'स्तनपान...'

Women Gave Birth To 9 Kids: एका किंवा दोन अगदी जास्तीत जास्त तिळ्यांचं प्लॅनिंग केलेलं असतानाच एकाच वेळी 9 मुलं झाली तर? हे असं खरोखरच एका महिलेबरोबर घडलं आहे. ही महिला कोण आणि सध्या त्यांचा हा 11 जणांचा संसार कसा सुरु आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 17, 2025, 14:14 PM IST
1/9

9babies

या महिलेचं आयुष्य सध्या कसं सुरु आहे, तिला या बाळासांना संभाळताना नेमका कोणता त्रास सहन करावा लागतो जाणून घेऊयात या खास फोटो गॅलरीमधून...

2/9

9babies

एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म दिल्याच्या तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण एका महिलेने चक्क 9 बाळांना एकच वेळी जन्म दिल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. ही महिला कोण ते पाहूयात...

3/9

9babies

आफ्रिकेध्ये राहणारी हलीमा सिस्से असं एकाच वेळी 9 बळांना जन्म देणाऱ्या महिलेचं नाव आहे. 4 मे 2021 रोजी मोरक्कोमधील कासाब्लांका येथे तिची प्रसूती झाली.

4/9

9babies

एकाच वेळी 9 बाळांना जन्म देणारी हलीमा ही जगातील एकमेव महिला असून यासाठी तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद करण्यात आली आहे.  

5/9

9babies

आधी हलीमाला 7 बाळं होतील असं मानलं जात होतं. मात्र प्रिमॅच्युअर सी सेक्शन डिलेव्हरीनंतर तिने 9 बाळांना एकाच वेळी जन्म दिला.  

6/9

9babies

हलीमाने 4 मुलं आणि 5 मुलींना जन्म दिला. सर्व बाळांची वजनं 500 ग्राम ते 1 किलोदरम्यान होती.  

7/9

9babies

बाळांच्या जन्मानंतर हलीमा आणि तिच्या नवऱ्याचं आयुष्य बदलून गेलं. बाळं 9 महिन्यांआधीच जन्माला आल्याने आधी या दोघांना त्यांचा संभाळ करताना फार कसरत करावी लागली.  

8/9

9babies

9 मुलांचं एकाच वेळी संगोपन करणं फारच जिकरीचं काम आहे. या मुलांना दिवसाला 45 डायपर लागतात. ही मुलं आठवड्याला 15 किलो दूध संपवतात.  

9/9

9babies

सगळी मुलं एकाच वेळी झोपत नसल्याने फार त्रास होतो असं हलीमा यांनी सांगितलं. तसेच सर्वांनाच स्तनपान करता येणं नाही, असंही त्या म्हणाल्या.