मृणाल ठाकूरचं सौंदर्य पाहून चाहत्याने केली लग्नाची मागणी, कमेंट्सला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

मृणाल ठाकूरचं सौंदर्य पाहून चाहत्याने थेट अभिनेत्रीला घातली लग्नाची मागणी. चाहत्याच्या त्या कमेंटवर अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Feb 22, 2025, 17:10 PM IST
1/6

लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने आतापर्यंत मराठी आणि हिंदी भाषांमध्ये काम केलं आहे. 

2/6

मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांना तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

3/6

नुकताच अभिनेत्रीने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये ती ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. 

4/6

या लूकमध्ये ती नवरीसारखी दिसत आहे. त्यासोबतच तिने हातात हिरव्या बांगड्या आणि डोक्याला मुंडावळ्या देखील बांधल्या आहेत.  तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 

5/6

तिने हा लूक तिच्या एका प्रोजेक्टसाठी केला होता. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की, अशी बायको असेल तर मी लग्नासाठी तयार आहे. 

6/6

चाहत्याने थेट कमेंट करून लग्नाची मागणी घातली आहे. तर अभिनेत्रीने त्याला रिप्लाय दिला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली की, 'यशस्वी भव' म्हणत हसण्याचे इमोजी जोडले आहेत.