PHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
Morning Weakness Causes: दिवसाची सुरूवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. पण जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहत नाही. खरं तर रात्रीची 7 ते 8 तास झोप आपल्या शरीराला आराम देण्यासाठी पुरेशी असते. असं असलं तरी अनेक लोकांना 7-8 तास झोप होत असूनही सकाळी खूप थकवा जाणवतो. जसं की रात्री ते झोपलेच नाहीत. आज ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक त्यासोबत असं होत असल्याचं सांगतात. पण यामुळे आपल्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत यामागील कारण आणि यावरचे उपाय समजून घेणे गरजेचे आहे.
1. झोपची गुणवत्ता

2. झोपेची अनियमित वेळ

3. तणाव आणि चिंता

4. चुकीची जीवनशैली

5. झोपेच्या आधी जड जेवण करणं

6. झोपेसाठी पुरक वातावरण नसणं

तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. जर तुम्ही झोपता त्या खोलीत आवाज किंवा प्रकाश असेल तर झोपेमध्ये व्यत्यय येऊन तुमची झोप नीट होणार नाही. उपाय- तुमची झोपण्याची जागा शांत आणि अंधारमय ठेवा. जर आजूबाजूला खूप आवाज असेल तर कानात कापसाचे बोळे आणि प्रकाशासाठी डोळ्यांवर पट्टी ठेवा.
7. शारीरिक हालचालींचा अभाव
