Weekly Horoscope : बुधादित्य राजयोग ‘या’ राशींचे अच्छे दिन, धनवर्षासह करिअरमध्ये प्रगती
Weekly Horoscope 17 to 23 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती झाली आहे. बुधादित्य राजयोग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय़ शुभ आणि आर्थिकबाबतीत भाग्यशाली मानली गेली आहे. हा राजयोग पाच राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
नेहा चौधरी
| Feb 16, 2025, 19:24 PM IST
1/12
मेष (Aries Zodiac)

आर्थिक बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला सिद्ध होणार आहे. आर्थिक लाभाची चांगली संधी चालून आली आहे. भागीदारी व्यवसायात तुम्हाला लक्षणीय फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात गुंतवणुकीच्या बाबतीत विशेष फायदे मिळणार आहे. तुम्हाला खूप सकारात्मक आणि उत्साही जाणवणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी वातावरण असणार आहे. परस्पर समज चांगली राहणार आहे. प्रवासाची शक्यता असून हा प्रवास तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मनात काही शंका येणार आहे. शुभ दिवस: 17, 18, 19, 20
2/12
वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी, हा आठवडा पैशाच्या बाबतीत प्रगतीशील असणार आहे. कुटुंबातील कोणतीही नवीन सुरुवात शुभ आणि फलदायी ठरणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. प्रवासातून तुम्हाला सामान्य फायदे मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती दिसणार आहे. काही कारणास्तव तुम्हाला पैशाची चिंता राहणार आहे. व्यवसायिकांचे पैसे अडकल्यामुळे तुमची झोप उडणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या जीवनात इच्छित बदल घडवून आणणार आहात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरीने निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यात येईल. शुभ दिवस: 19, 21
3/12
मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले परतावे मिळतील. तुमचा व्यवसाय वाढ पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही जितकी जास्त विश्रांती घ्याल तितके तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. कुटुंबातील मतभेद संवादाद्वारे सोडवा. या आठवड्यात प्रवास टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणी येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मर्यादा जाणवणार आहेत. एखाद्या प्रकल्पाबद्दल चिंता वाढणार आहे. वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे, तुमचा तुमच्या बॉसशी वाद होणार आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. शुभ दिवस: 17, 18
4/12
कर्क (Cancer Zodiac)

या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आर्थिक लाभ होमार आहे पण तुम्ही जितक्या काळजीपूर्वक गुंतवणूक कराल तितका जास्त नफा मिळणार आहे. प्रवासासाठी हा आठवडा शुभ राहणार आहे. तुम्ही एखाद्या छान ठिकाणी जाण्याचा विचार करणार आहात. कामाच्या ठिकाणी अचानक समस्या उद्भवणार आहे. तुम्हाला वाटेल की तुम्हाला योग्य तो आदर मिळणार नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या कामावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असणार आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे मोठे नुकसान होणार आहे. या आठवड्यात तुम्ही ऑफिसमधील कुठलेही प्रकारचे वाद टाळा. शुभ दिवस: 17, 20, 21
5/12
सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या यशाचा आनंद साजरा करणार आहात. जर तुम्ही भविष्याचा विचार करून आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेतल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात सुख आणि समृद्धी पाहिला मिळेल. परस्पर प्रेम वाढणार आहे. प्रवासातून सामान्य लाभ होईल. प्रवासासाठी केलेल्या कष्टाचे फळ भविष्यात प्राप्त होणार आहे. व्यवसायात प्रत्येक पैलूचा विचार करून निर्णय घेतल्यास ते चांगले परिणाम मिळणार आहे. शुभ दिवस: 19, 23
6/12
कन्या (Virgo Zodiac)

या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याची पाहिला मिळाली. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन दिसून येणार आहे. प्रवासातून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या तुम्हाला दुःखी करणार आहेत. तरुणांशी समन्वयाचा अभाव प्रकल्पात अडथळा आणणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात नवीन कल्पना येऊ शकतात आणि पैसे गुंतवण्यात तुम्हाला नफा मिळणार आहे. शुभ दिवस: 17, 20, 21
7/12
तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी, हा आठवडा करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत आदर आणि सन्मानाने भरलेला असणार आहे. तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. आदर या आठवड्यात वाढणार आहे. तुमच्या प्रकल्पात इच्छित बदल पाहिला मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासह आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबात एक नवीन सुरुवात शांती आणणार आहे. परस्पर प्रेम दृढय होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाबाबत काही शंका असणार आहे. मात्र प्रवास केल्यास ते चांगले राहणार आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आनंद आणि समृद्धीची पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात कोणालाही पैसे देऊ नका आणि कोणाकडूनही पैसे घेऊ नका. शुभ दिवस: 17, 20, 21
8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. महिलेच्या मदतीने तुम्हाला यश मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये, कोणतेही कागदपत्र काळजीपूर्वक वाचा आणि पाठवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. आरोग्य सुधारणा पाहिला मिळणार आहे. वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला आनंद प्राप्त होईल. प्रवासातून सामान्य लाभ होणारा आहे. हळूहळू कुटुंबात सुख आणि समृद्धी नांदणार आहे. भावनिक कारणांमुळे प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम आणि आनंद प्राप्त होईल. या आठवड्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. शुभ दिवस: 18, 21
9/12
धनु (Sagittarius Zodiac)

या आठवड्यात धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचा आणि संपत्तीत वाढीचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरशी संबंधित एक उत्तम संधी प्राप्त होणार आहे. प्रवासादरम्यान संतुलन राखले तर चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाबद्दल तुम्हाला काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे, मात्र तरीही मन एखाद्या गोष्टीबद्दल उदास राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवणार आहे. आठवड्याच्या शेवटी इच्छित बदल घडवून आणण्यासाठी वेळ लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाबाबत काही नवीन आणि मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. तुमच्या संपत्तीत आणि सन्मानात वाढ होणार आहे. भाग्यवान दिवस: 18, 20
10/12
मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या बाबतीत प्रगतीने भरलेला असेल. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्ही जितके हुशारीने गुंतवणूक कराल तितके जास्त यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. परस्पर प्रेम वाढवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. या आठवड्यात प्रवास टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होणार आहे. या आठवड्यात काही कारणास्तव तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. पैशांबाबत कोणताही निर्णय खूप विचार करून घ्या. आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक राहा आणि निर्णय घ्या. शुभ दिवस: 17, 19
11/12
कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीचे लोक या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार असून त्यांचं मन प्रसन्न राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे मत उघडपणे व्यक्त करणार आहात. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. प्रवासातून सामान्य लाभ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, जीवनात अनेक बदल पाहिला मिळणार आहे. एका नवीन टप्प्याला सामोरे जाणार आहात. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नफा आणि प्रगतीची शक्यता आहे. या आठवड्यात पैशांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सर्व प्रकारची मदत मिळेल आणि तुमचा आदर वाढेल. शुभ दिवस: 18, 19, 21
12/12
मीन (Pisces Zodiac)
