'छावा'ने मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड, मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यानेही केली Tax Free ची घोषणा

विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अशातच आता निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 

Soneshwar Patil | Feb 20, 2025, 19:00 PM IST
1/7

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलीय. 

2/7

प्रेक्षकांना 'छावा' चित्रपटाची कथा खूपच आवडली आहे. थिएटरमध्ये चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 'छावा' चित्रपट मध्य प्रदेशात करमुक्त करण्यात आला आहे.

3/7

यानंतर, चित्रपटाला दुसऱ्या राज्यात देखील कर भरावा लागणार नाही. नुकताच 'छावा' चित्रपट गोव्यातही करमुक्त करण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती पोस्टद्वारे दिली आहे. 

4/7

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी 'छत्रपती संभाजी महाराज की जय! म्हणत 'छावा' चित्रपटासंदर्भात पोस्ट केलीय.

5/7

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित 'छावा' हा चित्रपट गोव्यात करमुक्त करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला देखील खूप आनंद होत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. 

6/7

यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी 'छावा' चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली होती. सध्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

7/7

'छावा' चित्रपटाने आतापर्यंत 206.68 कोटींची कमाई केली आहे. काही दिवसांमध्ये या चित्रपटाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.