रशियाच्या चौकाचौकात रणगाडे; बंडखोर इशारा देत म्हणाले, "लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष..."
Wagner Rebellion Vladimir Putin: रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील दीड वर्षांपासून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये (Russia Ukraine War) युक्रेनसाठी टाकलेल्या ट्रॅपमध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) स्वत: अडकल्याचं पहायला मिळत आहे. 25 हजार सैन्यशक्ती असलेल्या 'वॅगनर ग्रुप' (Wagner Group) नावाच्या मोठ्या लष्करी गटाने रशियाविरोधातच बंड पुकारलं असून युक्रेनमधून यू-टर्न घेत रशियावरच चाल करण्यास सुरुवात केलीय. थेट पुतिन यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची भाषा या गटाने केली असून या गटाचं नेतृत्व पुतिन यांचाच एक निकटवर्तीय करत आहे.
Swapnil Ghangale
| Jun 24, 2023, 17:18 PM IST
1/14

रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाच बसताना दिसत आहे. पुतिन यांना त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने चॅलेंज केलं असून थेट पुतिन यांची सत्ता उलथून टाकण्याची भाषा या व्यक्तीने केली आहे. लवकरच देशाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल असंही या व्यक्तीने म्हटलंय.
2/14

3/14

4/14

5/14

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोठी चूक केल्याचं 'वॅगनर ग्रुप'चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांनी म्हटलं आहे. तसेच पुतिन यांना सत्तेमधून पायउतार व्हावं लागणार असल्याचा दावाही प्रोगोझिन यांनी केला आहे. पुतिन यांनी या आव्हानाला उत्तर देताना आपण हे बंड मोडून काढणार असून 'वॅगनर ग्रुप'ला चिरडून टाकू असं म्हटलं आहे.
6/14

7/14

8/14

9/14

10/14

11/14

आज आपण ज्या गोष्टींचा सामना करत आहोत हा अंतर्गत विश्वासघात केल्याचा प्रकार आहे. आपल्याला देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे. जो कोणी बंडखोरांच्या बाजूने जाईल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. बंडखोरांना साथ देणाऱ्यांना कायद्याला आणि रशियन लोकांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असं पुतिन यांनी संतापून म्हटलं आहे.
12/14

सध्या देशात जे काही सुरु आहे हे आपल्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. आम्ही आमच्या लोकांच्या प्राणांसाठी आणि सुरक्षेसाठी लढत आहोत. त्यामुळेच मतभेद विसरुन आपण एकत्र येण्याची गरज आहे. या शसस्त्र बंडखोरीला आम्ही सडेतोड उत्तर देणार आहोत, असं पुतिन यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.
13/14
