महालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य
मराठी मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य, महालात सजणार जान्हवी आणि जयंतचा लग्नाचा मांडव. आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्यामध्ये पारू सहभागी होईल का? जाणून घ्या सविस्तर
Soneshwar Patil
| Jan 29, 2025, 17:46 PM IST
1/7

मराठी टेलिव्हिजनचा येणारा आठवडा मनोरंजनची खास मेजवानी घेऊन येत आहे. कारण होणार आहे 'लक्ष्मी निवास' आणि 'पारू' या दोन मालिकांचा महासंगमम. दळवी आणि किर्लोस्कर कुटुंब एकत्र येत आहे भव्य मंगलकार्यासाठी. दळवी कुटुंब सज्ज आहे जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी, तर दुसऱ्या बाजूला आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा सोहळात किर्लोस्कर चारचांद लावायला तयार आहेत.
2/7

भव्य मंगलकार्य म्हटलं म्हणजे हे कार्य पार पडण्यासाठी स्थळही तितकच भव्य हवं. तेव्हा पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर हे भव्य मंगलकार्य खऱ्या अर्थाने आलिशान महालात पार पडत आहे. पण त्याआधी अहिल्यादेवी आणि जयंतमध्ये स्थळासाठीची रस्सीखेच सुरु आहे, त्याच दरम्यान हे उलगडतं की अहिल्या आणि लक्ष्मी मैत्रिणी आहेत.
3/7

4/7

5/7

6/7
