आपलं कोकण लय भारी! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या बॉलीवुडच्या हॉरर चित्रपटाचे शुटिंग इथचं झालयं

 'मुंज्या' या चित्रपटाचे शुटींग महाराष्ट्रातील एका सुंदर गावात झाले आहे. पाहूया या गावाचे सुंदर फोटो.  

वनिता कांबळे | Aug 29, 2024, 23:49 PM IST

Munjya  movie shooting in Guhagar Beach : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे कोकणात झालंय. जाणून घेऊया कोकणात नेमकं कुठं झाले आहे या चित्रपटाचे शुटिंग. 

1/7

मुंज्या चित्रपटात दाखवण्यात आलेला सुंदर समुद्रकिनारा आणि रहस्यमयी गाव महाराष्ट्रातील कोकणात आहे.    

2/7

पावसाळी ट्रीप करायची असेल तर गुहागर हे बेस्ट ऑप्शन आहे. समुद्र किनाऱ्यांसह अनेक प्राचीन मंदिरे तसेच जवळपास लहान मोठे धबधबे देखील आहेत. 

3/7

 मुंबईहून थेट गुहागरला बसने जाता येते. जवळचे रेल्वे स्थानक हे चिपळूण आहे.   

4/7

पांढरी वाळू, सुरुची बन आणि दीरवर पसरलेला अथांग समुद्र किनारा... इथं आल्यावर मनाला एक विलक्षण शांतता मिळते.   

5/7

गुहागरचा समुद्रकिनारा पाहून  मन प्रसन्न होते. चित्रपटात दाखवलं आहे त्यापेक्षा प्रत्यक्षात हा समुद्र किनारा खूपच सुंदर आहे.

6/7

 'मुंज्या' या चित्रपटाची कथा कोकणातील आहे. हा चित्रपट एक हॉरर आणि थ्रिलर मूव्ही आहे.   

7/7

 'मुंज्या'चं शूटिंग कोकणातील कुडाळ आणि चिपळूणमधील गुहागर येथे झाले आहे.