मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात, आत्तापर्यंत इतक्या वेळा मनोज जरांगेंनी उपोषण केलंय!
25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. यावेळी त्यांनी बऱ्याच मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मनोज जरांगे यांनी याआधीही उपोषणाचे हत्यार उपसत सरकारला वेठीस धरले होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्तापर्यंत किती वेळा उपोषण केले आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
Manoj Jarange Hunger Strike: 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. यावेळी त्यांनी बऱ्याच मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मनोज जरांगे यांनी याआधीही उपोषणाचे हत्यार उपसत सरकारला वेठीस धरले होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्तापर्यंत किती वेळा उपोषण केले आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
पहिले उपोषण: 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 ते 14सप्टेंबर 2023 या कालावधी पहिले उपोषण केले. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री आले आणि हे उपोषण सोडवले. या उपोषणात सरकारला आश्वासन पूर्ण करण्यासाठी 45 दिवसाची मुदत दिली. तसेच, दुसरं उपोषण करण्याआधी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजाची जाहीर सभा घेतली. या सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित होते.
दुसरे उपोषण: 25 ऑक्टोबर 2023 ते 02 नोव्हेंबर 2023 (8 दिवसांचे उपोषण)

तिसरे उपोषण: 20 जानेवारी ते 27 जानेवारी 2023 (8 दिवसांचे उपोषण)

चौथे उपोषण: 8 जून ते 13 जून( 6 दिवसांचे उपोषण)

पाचवे उपोषण: 20 ते जुलै 2024 (5 दिवसांचे उपोषण)

जरांगे यांचे 20 जुलै 2024 पासून 5 वे उपोषण 5 दिवस सुरू होते पण तब्बेत खालावत चालल्यानं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने सलाईन लावलं .सलाईन लावून बेगडी उपोषण मी करत नाही असा आरोप करून जरांगे यांनी बिड जिल्ह्यातील नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज आणि अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणातील जखमी महिला यांच्या हातून ज्यूस पिऊन हे उपोषण सोडवलं.
सहावे उपोषण: 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर (8 दिवसांचे उपोषण)

जरांगे यांनी 6 वे 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत केले. सरकार कडून कोणतेही शिष्टमंडळ न आल्याने गावातील महिलांच्या हातून पाणी पिऊन जरांगे यांनी हे उपोषण सोडवले. जरांगे यांनी आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा केला. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांचे त्यांनी 3 वेळा दौरे केले. राज्य सरकार 'सगे सोयरे' कायदा करत नसल्याने जरांगे यांनी 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले होते.
सातवे उपोषण
