Photo: जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या स्थानावर?

अनेक देशांतील वेगवेगळ्या जातीतील, परंपरेतील लोक 'आनंद' शोधत असतात. पण आनंद हा इतरांकडून मिळत नाही किंवा विकत घेता येत नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींतून आनंदी व्हायचं असतं.  

Feb 23, 2025, 17:09 PM IST
1/8

Photo: जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या स्थानावर?

काही दिवसांपूर्वीच आनंदी राहणाऱ्या देशांची यादी समोर आली आहे. तुम्हाला माहित आहे का? या यादीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे?  

2/8

ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड

ऑस्ट्रेलिया हा देश आनंदी राहणाऱ्या देशांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. पोठोपाठ 9 व्या क्रमांकाचा देश स्वित्झर्लंड आहे.  

3/8

लक्समबर्ग आणि नॉर्वे

लक्समबर्ग हा सर्वात जास्त आनंदी देशांच्या यादीतील आठव्या क्रमांचा देश आहे तर सातव्या क्रमांकावर नॉर्वे या देशाचं नाव आहे.  

4/8

नेदरलँड आणि इस्रायल

नेदरलँड हा सहाव्या क्रमांकाचा आनंदी देश असून इस्रायल या देशाने आनंदी राहण्याच्या बाबतीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.  

5/8

स्वीडन आणि आइसलंड

आनंदी आणि खूश राहणाऱ्या देशांच्या यादीत स्वीडन आणि आइसलंड हे अनुक्रमे चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

6/8

डेनमार्क

खूप खूश आणि आनंदी राहणाऱ्या देशांच्या यादीत डेनमार्क दुसऱ्या स्थानावर आहे. तर मग जाणून घ्य या यादीत पहिला क्रमांक कोणाचा?  

7/8

फिनलेंड

ज्या देशात सर्वात जास्त आनंदी लोक राहतात तो देश फिनलैंड आहे. या देशातील लोक खूप आनंदी असतात आणि भावनिक दृष्ट्या खूप सुदृढ आहेत.  

8/8

भारत या बाबतीत जरा कमी पडला आहे. आनंदी राहणाऱ्या देशांच्या यादीत भारत 126 व्या क्रमांकावर आहे.