Mahashivratri 2025: बेलपत्र खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? महाशिवरात्रीपुर्वी एकदा वाचाच

Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा महादेवाच्या पुजेसाठीचा अतिशय पवित्र दिवस आहे. यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025, बुधवार रोजी आहे. या दिवशी भक्त महादेवाची विशेष पूजा करतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. 

Feb 20, 2025, 18:13 PM IST
1/6

हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजा विधीला एक वेगळे महत्त्व असते. प्राचीन काळापासून चालत येणाऱ्या या परंपरांपैकी एक म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे. बेलपत्राला त्रिदलदेखील म्हणतात. आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो ते बेलपत्र आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे.

2/6

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण केले जाणारे बेलपत्र कित्येक जण खातातसुद्धा. असे म्हणतात की यामुळे अनेक आजार दूर होतात. आयुर्वेदातसुद्धा याला खूप महत्त्व आहे.  

3/6

बेलपत्र आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या झाडाच्या फळ, पाने, खोड यांना आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. बेलपत्रांपासून बनवलेला काढा बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतो.  

4/6

खोकला झाल्यास बेलपत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. ते खाल्ल्याने कफ लवकर बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते. बेलपत्र खाल्ल्याने पोटाचे अनेक त्रास दूर होतात.  

5/6

बेलाचे फळ खाल्ल्याने पोटाला गारवा जाणवतो. उन्हाळ्यात लोक बेलाचा गर काढतात आणि त्यातला रस करून पितात. हे रस अनेक पोषक तत्वांनी भरपूर असते. बेलाच्या पानांची पावडर करून नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होते. या तेलाने डोक्याची मालिश केल्याने केसांना पोषण मिळते आणि त्यांची वाढ होते.

6/6

बेलाच्या फळातून निघणाऱ्या गराचा उपयोग फेसपॅकसाठी केला जातो. बेलामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. याचा उपयोग फोड किंवा मुरुम बरे करण्यासाठीही केला जातो.