भाजपकडून खऱ्याखुऱ्या राजेसाहेबांना लोकसभेचं तिकीट; कुठे आहे त्यांचं साम्राज्य?
Loksabha Election 2024 : महाराष्ट्राप्रमाणं देशातील इतर भागांमध्येही राजघराणी आजही अस्तित्वात असून त्यांची पुढची पिढी कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे. देशातील असंच एक राजघराणं आता चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे लोकसभा निवडणूक.
BJP Mysore Lok Sabha Candidate: भारतात राजेशाही पद्धत संपुष्टात आली असली तरीही आज कैक संस्थानं अशीही आहेत जिथं त्यांच्या हाती मोठा प्रांत असून, त्या प्रांतात आणि प्रांताबाहेरही राजेघराण्यांना मानाची वागणूक मिळते.
1/7
म्हैसूर

2/7
लोकसभेचं तिकीट

1399 ते 1947 पर्यंत इथं वाडियार राजवट होती असंही सांगितलं जातं. 18 व्या शतकरामध्ये हैदर अली आणि टीपू सुल्तान यांनीही म्हैसूर प्रांतावर राज्य केलं. अशा या म्हैसूरच्या राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त वाडियार यांना भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं आहे. कर्नाटकात आजही राजघराण्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं जातं.
3/7
वाद

याच प्रांतातील म्हैसूर कोडागू लोकसभेच्या जागेवर यापूर्वी भाजपचेच प्रताप सिम्हा नियुक्त होते. पण, यंदा मात्र त्यांना डावलून पक्षानं थेट राजघराण्यातील व्यक्तीलाच तिकीट दिलं आहे. सिन्हा हे तेच खासदार होते, ज्यांच्या पासवर संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली होती. ज्यामुळं यंदा त्यांना संधी मिळाली नाही.
4/7
राजेसाहेबांची उमेदवारी

राहिला मुद्दा राजेसाहेबांच्या उमेदवारीचा, तर यदुवीर कृष्णदत्त वाडियार 31 वर्षांचे असून, 2015 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता. मॅसाच्युट्स विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी आणि अर्थशास्त्र अशा विषयांमध्ये पदवपी शिक्षण पूर्ण केलं आहे. अमेरिकेत त्यांचं शिक्षण झालं असून, गिटार आणि वीणा वादनावर त्यांचं विशेष प्रेम.
5/7
नामकरण

6/7
राजस्थानशी नातं
