Janhvi Kapoor Photoshoot: जान्हवी कपूरच्या नथीचा नखरा पाहून प्रियकरही झाला घायाळ
Janhvi Kapoor Latest Photoshoot Pics Viral: जान्हवी कपूर सध्या आपल्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरुन जान्हवी अनेकदा वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो ती पोस्ट करत असते. नुकताच तिने अगदी देसी आणि त्यातही नथ घालून केलेल्या एका फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
1/7

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोशूटमधील (Janhvi Kapoor Latest Photoshoot) काही खास फोटो शेअर केले आहेत. जन्हवीने इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये ती फारच सुंदर लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही प्रतिक्रिया आहे जान्हवीचा कथित प्रियकर शिखर पहाडियाची. शिखर काय म्हणाला आहे पाहूयात...
2/7

3/7

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) शुक्रवारी (27 जानेवारी 2023 रोजी) पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी परिधान केली आहे. फोटोमधील बॅकग्राऊण्ड साडीच्या रंगाची मॅच होणारी आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने नाकामध्ये नथ घातली असून ही नथ जान्हवीला फार सुंदर दिसत आहे.
4/7

5/7

जान्हवीच्या (Janhvi Kapoor) या फोटोंवर अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला कपूरनेही कमेंट करताना 'ब्रो' असं लिहून आगीचा इमोन्जी शेअर केला आहे. तर जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्यासहीत अनेक सेलिब्रिटींनी हार्ट इमोन्जी पोस्ट करत जान्हवीचे फोटो आवडल्याचं म्हटलं आहे. जान्हवीचा कथित प्रियकर शिखर पहाडियानेही या फोटोवर हार्ट इमोन्जी पोस्ट केला आहे.
6/7
