जेव्हा खेळण्यातली बंदूक दाखवून अख्ख विमान झालं हायजॅक! 1978 चा तो किस्सा...
आपण हे कायम बघतो की भारतात समर्थक त्यांच्या आवडत्या राजकारण्यांसाठी कुठल्याही थराला जातात. मात्र इंदीरा गांधींच्या कार्यकर्त्यांनी असे काहीतरी केले होते, ज्याने संपूर्ण देशाला आवाक केले. 2 समर्थकांनी एका खेळण्यातल्या बंदूकीच्या आणि चेंडूच्या मदतीने विमान हाइजॅक केले होते.
1978 साली इंदीरा सरकार जेव्हा पडले आणि इंदीरा गांधींना अटक झाली .तेव्हा इंदीरा गांधींचे समर्थक निराश होते. भोलानाथ पांडे आणि त्याचा मित्र देवेंद्र पांडे हे दोघे इंदीरा गांधींचे कट्टर समर्थक होते. या दोघांनी खेळण्यातल्या बंदूकीच्या सहाय्याने विमान हाइजॅक केले.
1/5
इंदीरा गांधींना अटक

1978 साली इंदीरा सरकार जेव्हा पडले आणि इंदीरा गांधींना अटक झाली . भारत आणीबाणीजन्य परिस्थितीतून बाहेर येण्याच्या प्रयत्नात होता. इंदीरा गांधींचे समर्थक निराश होते.इंदीरा गांधींना सोडवण्यासाठी लोक आवाज उठवत होते. भोलानाथ पांडे आणि त्याचा मित्र देवेंद्र पांडे हे दोघे इंदीरा गांधींचे कट्टर समर्थक होते.त्यांना कोणत्याही परिस्थितीत इंदीरा गांधींना सोडवायचे होते.
2/5
खोट्या हत्याराच्या मदतीने हाइजॅक

3/5
विमान हाइजॅक का केले?

भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या दोघांचा हेतु इंदीरा गांधींना अटकेतून सोडवणे हा होता.त्यांनी विमान हाइजॅक करुन ,सरकारकडे इंदीरा गांधींना अटकेतून सोडा अशी मागणी केली होती . वैमानिकाला खोटी बंदूक दाखवून ती खरी असल्याचे सांगितले आणि चेंडूला त्यांनी बॉम्ब म्हटले . वैमानिक आणि प्रवासी त्यांच्या दिखाव्यांना बळी पडले आणि घाबरुन गेले.
4/5
इंदीरा गांधींना भेटायची मागणी

भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या दोघांनी वैमानिकाद्वारे सरकारकडे इंदीरा गांधींना भेटायची मागणी केली, मात्र सरकारने मागणी पुर्ण करण्यास नकार दिला. सरकारने भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या दोघांना आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला बऱ्याच तासांपर्यंत त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.इंदीरा गांधींना सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
5/5
विधानसभेचे तिकीट मिळाले
