महाभारत युद्धात श्रीकृष्णाचे वय किती होतं? भीष्म पितामहबद्दल या गोष्टी जाणून बसेल धक्का

Mahabharat Unknown Facts: कुरुक्षेत्राच्या मैदानावर झालेल्या 'महाभारत' युद्धादरम्यान अशा अनेक घटना घडल्या ज्या आजही लोकांना प्रभावित करतात. अशा परिस्थितीत या युद्धाबाबत अनेकदा अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात.

नेहा चौधरी | Feb 20, 2025, 18:51 PM IST
1/7

महाभारत याचा लोकांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होतो. असंख्य लोकांनी महाभारत वाचलंय तर मालिकेच्या माध्यमातून ते घरोघरी पोहोचलंय. पण महाभारत वाचत असताना यातून अनेकांना काही प्रश्न पडतात. 

2/7

महाभारताचे युद्ध आजही सामान्य लोकांना गोंधळात घालतं. या पुस्तकाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. जसे अनेक लोकांना जाणून घ्यायचे आहे की युद्धादरम्यान श्रीकृष्णाचे वय किती असेल. 

3/7

अशा परिस्थितीत, आज आपण महाभारताच्या वेळी योद्ध्यांचे वय किती असेल याबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या जगात मनुष्य हा चांगले अन्न आणि शुद्ध वातावरणात जास्त जास्त 100 वर्ष जगतो. पण कृष्णाचे वय महाभारतातील युद्धात किती असेल. 

4/7

आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये माणसाचे आयुष्य सुमारे 125 वर्षे सांगण्यात आलंय. असं मानलं जातं की प्राचीन काळी पृथ्वीचे वातावरण असे होते की एखादी व्यक्ती ही जवळपास 300 ते 400 वर्षांपर्यंत जगत असे. सांस्कृतिक आणि पौराणिक ग्रंथांनुसार, हजारो वर्षे जगणारे अनेक मानव असल्याचा उल्लेख आहे. 

5/7

हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की हनुमान, अश्वत्थामा, विभीषण, व्यास, परशुराम, बाली आणि कृपाचार्य असे अनेक महापुरुष अजूनही जिवंत आहेत. मात्र आज आपण महाभारत युद्धात भाग घेतलेल्या काही खास पात्रांबद्दल बोलत आहोत, ज्यांच्याबद्दल सामान्य लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की युद्धादरम्यान त्यांचे वय किती असेल.   

6/7

असं म्हटलं जातं की महाभारताचे युद्ध इ.स.पूर्व 3067 मध्ये झाले. त्यावेळी श्रीकृष्णाचे वय 55- 56 होते. मात्र, काही विद्वानांचा असाही विश्वास आहे की त्यावेळी भगवान श्रीकृष्ण 83 वर्षांचं असल्याचा उल्लेख आहे. कारण असं मानलं जातं की महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी भगवान श्रीकृष्णाने आपले शरीर सोडले. तेव्हा ते 119 वर्षांचे असेल. 

7/7

महाभारत युद्धादरम्यान, श्रीकृष्णाचे वय 83 वर्षे असल्याचे सांगितले जाते, तर अर्जुनाचे वय 55 वर्षे असेल, तर भीष्म पितामह यांचे वय सुमारे 170 वर्षे असल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या वयाच्या आधारे, महाभारतातील इतर योद्ध्यांच्या वयाचा अंदाज लावता येतो. असं म्हटलं जातं की अर्जुन युधिष्ठिर आणि दुर्योधनापेक्षा सुमारे 2 वर्षांनी मोठा होता.