वयाच्या 40 व्या वर्षी पहिले लग्न, 2 वर्षात घटस्फोट; आता 54 व्या वर्षी ही टॉप अभिनेत्री कोणाला करतेय डेट?
तिने तिच्या एका मुलाखतीदरम्यान असे काहीतरी सांगितले, ज्यानंतर तिच्या आयुष्यात नक्कीच कोणीतरी खास आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
तेजश्री गायकवाड
| Jan 12, 2025, 12:13 PM IST
तिने तिच्या एका मुलाखतीदरम्यान असे काहीतरी सांगितले, ज्यानंतर तिच्या आयुष्यात नक्कीच कोणीतरी खास आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
1/7

2/7

3/7
कोण आहे इंडस्ट्रीतील ही टॉप अभिनेत्री?

आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने 90 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गोविंदा, बॉबी देओल, सनी देओल, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांसारख्या इंडस्ट्रीतील सर्व बड्या स्टार्ससोबत त्यांनी हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तिचे चित्रपट खूप पसंत केले जातात. अलीकडेच तिची एक मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर अंदाज लावला जात आहे की, 54 व्या वर्षी ही अभिनेत्री 'कुणा तरी खास'ला डेट करत आहे.
4/7
90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री

इथे आपण मनीषा कोईरालाबद्दल बोलत आहोत. या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जन्म 1970 मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला होता. मनिषाने तिच्या करिअरमध्ये किमान 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मनीषा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही, पण अलीकडे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषत: तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलली आहे. जेव्हा तिला विचारण्यात आले की तिच्या आयुष्यात जोडीदाराची कमतरता जाणवते का? तर त्याचं उत्तर असं होतं ज्यावरून आयुष्यात कदाचित कोणीतरी खास असेल असं चाहत्यांना वाटलं.
5/7
टॉप अभिनेत्री कोणाला डेट करत आहे का?

मात्र याबाबत डिटेलमध्ये माहिती देण्यास मनीषाने टाळाटाळ केली. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मनीषा म्हणाली, "माझ्याकडे कोणी नाही असे कोणी सांगितले? हे बरोबर आणि चुकीचे दोन्ही आहे, कारण मी माझे जीवन आणि स्वतःला चांगले समजले आहे. माझ्या आयुष्यात जोडीदार आला तर मी त्याच्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. जर माझा जोडीदार माझ्याशी जुळवून घेऊ शकला तर मला खूप आनंद होईल. पण मी निर्माण केलेले जीवन मला अजिबात बदलायचे नाही."
6/7
माझे आयुष्य चांगले जगत आहे
