अंडरवर्ल्डसोबत या बॉलिवूड स्टार्सची नावं, काहींना जेल तर काहींचे करिअर बरबाद
Bollywood connection with underworld : गेल्या काही दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते. त्यामुळे साहजिकच अनेक स्टार कलाकारांचा हा बॉलिवूडशी संबध येत होता. त्यामुळे अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंध अनेकदा चर्चेत होते. हे 80 आणि 90 च्या दशकात घडले. त्यावेळी अनेक अभिनेत्रींची नावे काही डॉनशी जोडली गेली. त्यानंतर काहींना जेल झाली तर काहींचे करिअर बरबाद झाले. मात्र, इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी आपले हृदय अंडरवर्ल्डच्या डॉन दिल्याचे पुढे आले आहे. अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंध अनेकदा चर्चेत राहिले आहेत.
1/5

1. संजय दत्त : बॉलिवूडमध्ये संजय दत्त याला प्रेमाने संजूबाबा म्हटले जाते. त्याने आपल्या अभिनयातून इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आणि ड्रग्सच्या सवयीमुळे त्याचे नाव खराब झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त याला अटक करण्यात आली होती. त्याचे नाव 90 च्या दशकात अबू सलीमशी जोडले गेले होते. त्याने आपल्या घरी फिस्तुल ठेवले होते. याप्रकरणी त्याला जेलही झाली.
2/5

3/5

3. ममता कुलकर्णी : एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. करण अर्जुन, चायना गेट यांसारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाणारी, ही अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉन विकी गोस्वामीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी होती. त्याच्याबद्दल असेही म्हटले गेले की तिने त्याच्याशी लग्न केले, परंतु याचा कोणताही पुरावा नव्हता. काही वर्षांपूर्वी तिचे नाव ड्रग्ज रॅकेटमध्येही आले होते.
4/5

4. मंदाकिनी : 'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लोक आजही तिची आठवण काढतात. मंदाकिनी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती. अंडरवर्ल्डचा मोठा डॉन दाऊद इब्राहिम तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला होता. दोघांनीही एकमेकांना डेट केले होते आणि दाऊद मंदाकिनीच्या प्रत्येक चित्रपटाला फायनान्स करत असे सांगितले गेलेय.
5/5
