IND vs WI: वेस्टइंडीज दौऱ्यात रोहित शर्माचा नवा लूक, गेलेला दाढी, मिशीत आता...
Rohit Sharma's New Look: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर (Windies Tour) आहे. भारतीय संघाचा हा मोठा दौरा असून या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा याआधीच करण्यात आली होती. आता टी20 संघाचीही घोषणाही करण्यात आली आहे. टी20 संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला (Virat Kohli) डच्चू देण्यात आला आहे.
1/5

2/5

3/5

टीम इंडियाने बारबाडोसमध्ये सराव सुरु केला आहे. पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाचा बारबाडोसमध्ये एक आठवड्याचा कॅम्प आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया एक सराव सामनाही खेळणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियात मोठा बदल केला आहे. कसोटी सामन्याचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून ड्रॉप करण्यात आलं आहे. तर यशस्वी, जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
4/5
