टीम इंडियाचे कोच गौतम गंभीरकडे ICC ट्रॉफी जिंकण्याच्या 5 संधी, साडेतीन वर्षात 'ही' आव्हानं
Gauram Gambhir : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अखेर दिग्गज फलंदाज गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीरकडे ही जबाबदारी साडे तीन वर्ष असणार आहे. या दरम्यान आयसीसीच्या पाच मोठ्या स्पर्धा होणार आहेत. यातलं पहिलं आव्हान असणार आहे ते चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं.
राजीव कासले
| Jul 09, 2024, 21:12 PM IST
1/7
टीम इंडियाच्या हेड कोचपदी नियुक्ती

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरची अखेर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गंभीरकडे ही जबाबदारी साडेतीन वर्ष असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर असणार अशी चर्चा सुरु होती. यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
2/7
राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला

राहुल द्रविड यांच्या जागी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर हे पद सांभाळेल. राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून टीम इंडियसाठी नवा बेंचमार्क सेट केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तर टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं.
3/7
पहिली आव्हान चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं

आता गौतम गंभीरच्या साडेतीन वर्षांच्या काळात आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या पाच संधी आहेत. यातलं पहिलं आव्हान असणार आहे ते पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं. आयसीसीने 2024 ते 2031 पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असेल.
4/7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. WTC चा तिसरा हंगाम आहे. पहिल्या दोन हंगामात टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर समोर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
5/7
टी20 वर्ल्ड कप 2026

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता 2026 मध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेत आयोजन केलं जाणार आहे. अशात 2026 मध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर उतरणाऱ्या टीम इंडियासमोर आपलं जेतेपद टिकवण्याचं आव्हान असेल.
6/7
एकदिवसीय वर्ल्ड कप 2027
