'स्त्री 2'नंतर 'या' 3 चित्रपटातून राजकुमार राव बॉक्स ऑफिस गाजवणार

बॉलिवूडमधील सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत आता राजकुमार रावचा देखील समावेश झाला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. 

Soneshwar Patil | Feb 21, 2025, 16:45 PM IST
1/7

राजकुमार रावसाठी 2025 हे खूपच खास असणार आहे. कारण या वर्षी एक नाही तर तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये तो कॉमेडी आणि अॅक्शन दोन्ही करताना बघायला मिळणार आहे. 

2/7

राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांना देखील तो खूप आवडला आहे.

3/7

या चित्रपटात राजकुमार राव पहिल्यांदाच वामिका गब्बीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

4/7

अभिनेता राजकुमार राव यांचा 'मलिक' हा चित्रपट 20 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.

5/7

या चित्रपटात राजकुमार राव जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. राजकुमार रावचा हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.

6/7

'टोस्टर'हा चित्रपट राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या कंपा फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. विवेक दास चौधरी दिग्दर्शित हा एक अनोखा कॉमेडी चित्रपट आहे.

7/7

या चित्रपटात राजकुमार रावसोबत सान्या मल्होत्रा देखील ​​दिसणार आहे. हा चित्रपटाची कथा अशी आहे की, एका माणसाला लग्नात भेट म्हणून टोस्टर मिळतो. मग चित्रपटाची कथा याचभोवती फिरते.