तुम्हीपण AC खिडकीत लावलाय का? यामुळे होऊ शकते शिक्षा, जाणून घ्या काय आहे नियम?
AC : दिल्लीत एसीमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काय आहे हे प्रकरण? आणि यामुळे होऊ शकतो थेट कारागृह?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Aug 20, 2024, 18:48 PM IST
AC Installation Rules: दिल्लीच्या करोल बाग परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका इमारतीखाली उभ्या असलेल्या निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये एका व्यक्तीवर एसी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
1/7
काय आहे प्रकरण

2/7
एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

3/7
AC मुळे होऊ शकते जेल

दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न उभा झाला आहे. यामध्ये घराच्या बाहेर किंवा खिडकीत लावलेल्या एसीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकारमुळे हे अधोरेखित झाले आहे की, निष्काळजीपणामुळे ही चूक चांगलीच महागात पडू शकते. कलम 125(ए)/106 बीएनएस अंतर्गत कारागृहात जाऊ शकता. आपण फक्त आपल्याच सुरक्षेचा नाही तर इतरांच्या लोकांच्याही समस्येचा विचार करणे आवश्यक आहे.
4/7
काय आहे 125(ए)/106 बीएनएस?

भारतीय कायद्यानुसार, जर कुणी निष्काळजीपणामुळे असं कृत्य कर असेल तर त्याचा परिणाम अतिशय धोकादायक असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला दोषी मनुष्यवधापेक्षा वेगळे मानले जाते आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 106 (किंवा 125-A) अंतर्गत येते. या गुन्ह्यासाठी कमाल 5 वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे. वैद्यकीय व्यावसायिकांकडून निष्काळजीपणा, वाहन चालवताना निष्काळजीपणा इत्यादी या कलमांतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची काही उदाहरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात शिक्षेची लांबी गुन्ह्याच्या गंभीरतेवर आणि इतर परिस्थितींवर अवलंबून असते.
5/7
तुरुंगवासाची तरतूद

निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीविताची किंवा मालमत्तेची हानी झाल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे. जर एखादी वस्तू, जसे की भांडे किंवा एसी, तुमच्या बाल्कनीतून पडून एखाद्याला दुखापत झाली तर तुम्ही या गुन्ह्यासाठी जबाबदार असाल. याव्यतिरिक्त, जर तुमचा एसी तुमच्या मालमत्तेच्या सीमेपलीकडे जात असेल तर ते अतिक्रमण मानले जाऊ शकते आणि तुमच्यावर कारवाई होऊ
6/7
कशी काळजी घ्याल?
