पाच माजी मंत्र्यानी थकवली ३ लाख ७८ हजाराची बिलं

 (अमित जोशी, झी २४ तास ) महाराष्ट्रातील मंत्री आणि राज्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतरही सरकारी सुविधेचा कशा दुरुप्रयोग करतात याचा प्रत्यय माजी ५ मंत्र्याने थकविलेली लाखों रुपयांच्या दूरध्वनी देयकामुळे येतो. माजी पाच मंत्र्यानी 3 लाख 78 हजार 134 रूपये रक्कमेचे दूरध्वनी देयक थकविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली असून चंद्रिका केनिया थकबाकीत आघाडीवर आहे.

Updated: Oct 20, 2015, 12:22 PM IST
पाच माजी मंत्र्यानी थकवली ३ लाख ७८ हजाराची बिलं

मुंबई : (अमित जोशी, झी २४ तास ) महाराष्ट्रातील मंत्री आणि राज्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतरही सरकारी सुविधेचा कशा दुरुप्रयोग करतात याचा प्रत्यय माजी ५ मंत्र्याने थकविलेली लाखों रुपयांच्या दूरध्वनी देयकामुळे येतो. माजी पाच मंत्र्यानी 3 लाख 78 हजार 134 रूपये रक्कमेचे दूरध्वनी देयक थकविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली असून चंद्रिका केनिया थकबाकीत आघाडीवर आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे दूरध्वनी देयकाची थकबाकीदार असलेल्या मंत्र्याची आणि राज्यमंत्र्याची माहिती मागितली होती.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस कळविले की वर्ष 1988 पासून 1995 पर्यंत 5 माजी मंत्री आणि राज्यमंत्री यांनी दूरध्वनी बिल थकविली आहेत. त्यामध्ये चंद्रिका केनिया ही सर्वात थकबाकी असलेली मंत्री आहे. 9 जुलै 1988 पासून 30 ऑक्टोबर 1988 या कालावधीत 2 लाख 41 हजार 272 रुपयाचा दूरध्वनीचा चुराडा केला आहे.

नरेंद्र कांबळे यांनी 6 जुलै 1987 पासून 27 जुलै 1987  आणि 11 जुलै 1991 पासून 31 डिसेंबर 1991 या दरम्यान 18 हजार 397 रुपयांच्या दूरध्वनीचा गैरवापर केला आहे.

पंडितराव दौंड यांनी 36 हजार 516 रुपयाचा दूरध्वनी 19 मार्च 1990 ते 29 मे 1990 यादरम्यान केला आहे.

सुबोध सावजी यांनी 22 मार्च 1993 ते 15 ऑक्टोबर 1993 यादरम्यान 57 हजार 793 रुपयाचा महाग दूरध्वनी केला होता.

विद्या बेलोसे यांनी 24 हजार 156 रुपयाचा दूरध्वनी 29 मार्च 1995 पासून 6 जून 1995 असा दूरध्वनी केला होता.

अशा माजी 5 मंत्र्यानी 3,78,134 रक्कमेचे दूरध्वनी देयक थकविले असून महाराष्ट्र शासनाने सतत नोटीस पाठवून थकबाकी रक्कम अदा करण्याची मागणी केली असून 7 नोव्हेंबर 2001 पासून 10 फेब्रुवारी 2015 या दरम्यान 9 वेळा थकीत रक्कम भरण्याचे कळविले आहे पण कोण्याही मंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही ना थकित रक्कम भरण्याचे सौजन्य दाखविले आहे,याबाबत अनिल गलगली यांनी खंत व्यक्त केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.