संजय लीला भन्साळी यांच्यावर कर्नी सेनेकडून हल्ला

सुप्रसिद्द दिग्दर्शक संजय लिला भन्सालीवर यांच्यावर हल्ला केला गेलाय. राजस्थानमधली ही घटना आहे. आगामी 'पद्मावती' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची भन्साळी यांच्यावर हल्ला करत सेटचीही तोडफोड करण्यात आली.  

Updated: Jan 27, 2017, 10:26 PM IST
संजय लीला भन्साळी यांच्यावर कर्नी सेनेकडून हल्ला

जयपूर : सुप्रसिद्द दिग्दर्शक संजय लिला भन्सालीवर यांच्यावर हल्ला केला गेलाय. राजस्थानमधली ही घटना आहे. आगामी 'पद्मावती' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची भन्साळी यांच्यावर हल्ला करत सेटचीही तोडफोड करण्यात आली.  

मेहरानगड किल्ल्यात शूटिंग सुरू असताना राजपूत कर्नी सेनेकडून 'पद्मावती' सिनेमाचा निषेध करत सामानाची तोडफोड केली. 

'पद्मावती' सिनेमात इतिहासाशी छेडछाड करण्यात येत असल्याचं कर्नी सेनेचं म्हणणं होतं. यावेळी, किल्ल्याच्या परिसरात असलेले अनेक साहित्याची तोडफोड केली गेली. यानंतर शूटिंग थांबवण्यात आलं.