बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2017, 09:55 AM IST
बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

नवी मुंबई : पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

या शोसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. जस्टीन बीबरची जादू भारतातही पाहायला मिळाली. लाईव्ह परफॉर्मेंसचा आनंद त्याच्या चाहत्यांनी लूटला. 'द फीलिंग या गाण्याने त्य़ाने या शोची सुरुवात केली.

येथील डी. वाय. पाटील स्टेडिअम खचाखच भरलेला होता. सगळीकडे तरुणाईने या गाण्यावर ठेका धरला. पांढरा टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केला कॅनडाचा 23 वर्षीय गायक बीबरने रंगमंचावर पाय ठेवले आणि उत्साहाला उधान आले.  ‘मार्क माई वर्डस’ नंतर त्याने ‘व्हेयर आर यू नाउ’ हे गाणं गायलं. या गाण्यानंतर सहायक डान्सर्सने त्याला  साथ दिली.

पाहा व्हिडिओ (सौजन्य - पिंकविला)