'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?

सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम आहे 'डबल-ट्रबल'... यात स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. सहाव्यांदा अभिनेता सलमान खान शो होस्ट करतोय.

Updated: Oct 12, 2015, 05:18 PM IST
'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?

मुंबई: सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम आहे 'डबल-ट्रबल'... यात स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. सहाव्यांदा अभिनेता सलमान खान शो होस्ट करतोय.

बिग बॉसच्या घरात यावेळी स्पर्धक दोन-दोनच्या जोडीत दिसतायेत. 

आणखी वाचा - Confirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं!

दिगगंना सूर्यवंशी आणि रुपल त्यागी 
दिगंगना सीरियल 'एक वीर की अरदास वीरा' आणि रुपल त्यागी 'सपने सुहाने लड़कपन के' मालिकेत प्रमुख भूमिकेत होत्या. 

अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि अमन वर्मा
'बिग बॉस'च्या घरात दुसरी जोडी आहे अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि अमन वर्माची आहे. अमन वर्मावर २००५मध्ये कास्टिंग काउचचा आरोप लागला होता. 

किश्वरचा रिअल लाइफ पार्टनर सुयश राय सुद्धा बिग बॉसच्या घरात आहे. पण दुसऱ्या जोडीदारासोबत. 'ओम शांती ओम', 'समर २००७' आणि 'तो बात पक्की'मध्ये काम केलेली अभिनेत्री युविका चौधरीची जोडी अभिनेता आणि गायक विकास भल्ला सोबत आहे.

रोशेल मारिया रावची जोडी 'एम टिव्ही रोडीज'चा विनर प्रिंस नरूलासोबत बनवली गेलीय. तर मारियाचा बॉयफ्रेंड कीथची जोडी मंदाना कारिमीसोबत आहे. टिव्ही अभिनेता अंकित गेरा गायक अरविंद वेगडाचा जोडीदार आहे. 

आणखी वाचा - व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.