सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

Updated: Oct 9, 2016, 06:56 PM IST
सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

लखनऊ : बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

मायावती यांनी म्हटलं की, '[उरीमधील शहीद जवानांना दिलेल्या अग्निची आग थंडी नाही झाली आहे पण मोदी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी युपीमध्ये दसरा साजरा करण्यासाठी येत आहे. स्वार्थासाठी ते दिवाळी साजरा करण्यासाठीही युपीमध्ये येऊ शकतात. भाजप आपले राष्ट्रीय नेते आणि विशेष करुन पंतप्रधान मोदींना लखनऊमधील दसऱ्याच्या धार्मिक कार्यक्रमात आणण्यासाठी मजबूर झाले आहेत. कारण यामधून काही गोष्टी धर्माच्या मागून ठेवता यावेत.'

चार वेळा यूपीच्या मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या मायावती यांनी समाजवादी पक्षावर देखील टीका केली. सपाच्या काळात गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.