व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.

Updated: Jan 20, 2015, 11:21 AM IST
व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!

न्यू यॉर्क: स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.

लुशियाना स्टेट विश्वविद्यालयाचे विल्मर बॅरेरा आणि डेव्हिड पीचा यांनी रताळ्याच्या पेशींच्या प्रकारांचं विश्लेषण केलंय. यानुसार रताळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी२चं प्रमाण इतर प्रकारांपेक्षा जास्त असतात. 

अभ्यासकांच्या मते, आपल्या जेवणात आवश्यक असलेलं बी६ व्हिटॅमिनचं प्रमाण रताळ्याची पानं योग्यरित्या पूर्ण करू शकतात. रताळ्यात असणाऱ्या व्हिटॅमिन बी६च्या प्रमाणाची तुलना आपण फळं आणि फुल कोबी, गाजर, केळी आणि कोबीसोबत करू शकतो. हा अभ्यास होर्टसायंस मासिकात प्रकाशित केला गेलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.