मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 74वर

Updated: Mar 22, 2020, 11:09 AM IST
मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत आणखी एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि  हृदयरोग असे आजार होते. एच.आर हिराणी रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 74वर गेली आहे. देशात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आणखी 10 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी 6 मुंबईत तर 4 रुग्ण पुण्यात आहे.