Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या
20 Feb 2025, 13:02 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कागदपत्रं फेरफार प्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. कोकाटेंचा भाऊ सुनील कोकाटेही दोषी. 2 वर्षांचा कारावास, 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
20 Feb 2025, 12:51 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन आणि मंत्रालयात ई मेलद्वारे देण्यात आली धमकी. मुंबई गुन्हे शाखा याची चौकशी करत आहे.
20 Feb 2025, 12:27 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: कल्याणमध्ये गोळीबाराची घटना, एकाचा मृत्यू
कल्याण पूर्व येथील नाना पावशे चौक परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक इसमावर गोळीबार करण्यात आला. रणजित दुबे नावाच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.
चुलत भावाने गोळीबार केल्याची कोलशेवाडी पोलिसांची प्राथमिक माहिती. उत्तरप्रदेशात जागेच्या वादातून सुरू होता वाद. काहीं दिवसांपूर्वी चार ते पाच लोकांनी घरात घुसून केली होती मारहाण. कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीचा शोध.
20 Feb 2025, 12:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
20 Feb 2025, 11:53 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: खळबळ! दादर परिसरात १० कोटींचे MD ड्रग्स जप्त
दादर परिसरात १० कोटींचे MDड्रग्स जप्त. दोघांना अटक. एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती.
20 Feb 2025, 11:33 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: सेना-भाजपात पुन्हा जुंपणार?
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर. ९०० कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता.जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात मिळाली होती गती. शिवसेना UBTचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको प्रशासनाला आदेश
20 Feb 2025, 10:42 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का? १४०० कोटींचे टेंडर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का दिलाय. मुंबई महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापनाचे १४०० कोटींचे टेंडर रद्द करण्यात आलंय. 4 वर्षांसाठी काढलं होतं टेंडर. प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा मागवल्या होत्या. सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गटा आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केले जाते. या प्रकल्पाविरोधात आंदोलनही उभारण्यात आलं होतं. तसेच प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलीय. पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावे यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आऱोप करण्यात आलाय.. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत.हा एकनाथ शिंदेंसाठी धक्का मानला जातोय.
20 Feb 2025, 09:59 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईतील न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्याचे सत्य समोर येणार?
मुंबईतील न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्याप्रकरणी एक मोठी अपडेट्स समोर येतेय. आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी सीईओचा जबाब नोंदवलाय. तसेच बँकेच्या सीएलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय.. बँकेच्या माजी सीईओ अभिनन्यू भोयन यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अनेक सवाल विचारलेत.. सीईओ असताना बँकेतील पद्धती आणि बँकेच्या तिजोरींमध्ये असलेल्या सुरक्षा उपायांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आलेत.
20 Feb 2025, 09:57 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: ढाका ते दुबईला जाणाऱ्या विमानाची नागपुरात इमर्जन्सी लँडिग
ढाका ते दुबईला जाणाऱ्या बोईंग 347 विमानामध्ये फायर इमर्जन्सी असल्याची सूचना काल 10 वाजून 17 मिनिटाला नागपूर विमानतळावर देण्यात आली होती. विमानामध्ये फायर अलार्म वाजल्यानंतर पायलटकडून ही सूचना एटीसीला आणि त्यांच्याद्वारे विमानतळ प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर नागपूर विमानतळावर फुल इमर्जन्सी डिक्लेअर करत सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. विमानात 396 प्रवासी आणि 12 क्रु मेंबर होते. 10:45 वाजता विमान नागपूर विमानतळावर लँड झाले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. संपूर्ण विमानाची आणि कार्गो सेक्शनची कसून चौकशी करण्यात आली. मात्र कुठेही आग किंवा शॉर्टसर्किट सारखी स्थिती लक्षात आली नाही. पूर्ण चेकिंग केल्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आले.
20 Feb 2025, 09:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
उद्यापासून दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होतेय. मुंबई विभागातून एकूण 3 लाख 58 हजार 854 विद्यार्थी बोर्ड परीक्षा देणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान दहावीची परीक्षा पार पडणारय.