Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या
21 Feb 2025, 09:09 वाजता
वाढवन विमानतळ प्रकल्प सुरू, अभ्यासासाठी एजन्सी 3 आठवड्यात निवडली जाऊ शकते
नवी मुंबईतील एमएमआरचे दुसरे विमानतळ सुरू होण्यास काही महिनेच बाकी आहेत आणि राज्य सरकारने पालघर येथील वाढवन बंदराजवळील तिसऱ्या प्रस्तावित विमानतळाचे काम सुरू केले आहे. विमानतळांचे नियोजन, बांधकाम, संचालन आणि देखभाल करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली विशेष कंपनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) ने वाढवन बंदर क्षेत्रात ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रस्ताबित केले आहे.
21 Feb 2025, 09:07 वाजता
कोस्टल रोडला जोडणाऱ्या दुसऱ्या कनेक्टरसाठी बीएमसी वाहतूक व्यवहार्यता अभ्यास करणार
दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी येथील रहिवाशांच्या मागणीनुसार महानगरपालिका मलबार हिलच्या नेपियन सी रोडवर वाहतूक व्यवहार्यता अभ्यास करणार आहे. जेणेकरून मुंबई कोस्टल रोडवर वाहनांना प्रवेश आणि बाहेर पडण्याची परवानगी देणारा एक नवीन रस्ता करण्याची शक्यता शोधता येईल.
21 Feb 2025, 09:02 वाजता
पश्चिम रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारणार
पश्चिम रेल्वे मुंबई विभाग स्टेशन परिसरात थुंकताना किंवा कचरा टाकताना आढळल्यास जास्तीत जास्त 500 रुपये दंड आकारेल. पूर्वी, दंड साधारणपणे 200 रुपये आकारला जात होता. रेल्वे कायद्यानुसार 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अशा वर्तनाला परावृत्त करण्यासाठी आहे. 2016 मध्येही असाच एक निर्णय घेण्यात आला होता जेव्हा दंड 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला होता. तथापि, प्रवासी संघटनेच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.
21 Feb 2025, 09:01 वाजता
मनोज जरांगे पाटील आज मसाजोग गावात
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज पुन्हा मस्साजोग गावात जाणार आहेत. यावेळी ते देशमुख कुटुंबाची भेट घेतील. तसंच मस्साजोग ग्रामस्थांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाबाबत गावक-यांशी चर्चा करतील. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबतही ते माहिती घेणार आहेत.
21 Feb 2025, 08:06 वाजता
दहावी परीक्षेसाठी बेस्ट, रेल्वेकडून जय्यत तयारी
दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे, यासाठी बेस्ट आणि रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांना 'हाता दाखवा, बस थांबवा,' असे आवाहन केले आहे. तर, लोकल सेवेत बिघाड होऊ नये, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जाणार आहे. दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रेल्वे, बेस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी बेस्ट बसला हात दाखविल्यास बस थांबवण्याचे निर्देश वाहनचालक, कंडक्टर निरीक्षकांना दिले आहेत. आणि बसच्या मार्गावर दहावीच्या परीक्षेचे केंद्र असल्यास विद्यार्थ्यांना केंद्रावर सोडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
21 Feb 2025, 08:05 वाजता
दिल्लीत आज साहित्यिकांचा भरणार मेळा
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिल्लीत सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे. सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहण होणार आहे. तसेच संसदेतून ग्रंथदिंडी निघण्याची शक्यता आहे. दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतील. त्यामुळे राजकारणातील सर्व दिग्गज अ. भा. साहित्य संमेलनाच्या मंचावर एकत्र दिसणार आहे.
21 Feb 2025, 07:59 वाजता
काँग्रेस नेत्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीच्या गंगा राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोटासंबंधीच्या कारणामुळे त्यांना गुरुवारी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
21 Feb 2025, 07:53 वाजता
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अडचणीत
बनावट कागदपत्राद्वारे शासकीय कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटेंची आमदारकी अडचणीत आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होत असते. त्यामुळे आता अपात्रतेबाबत विधिमंडळ सचिवालयाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
21 Feb 2025, 07:50 वाजता
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर
- पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या खटल्यात समन्स वारंवार अनुपस्थित राहत असल्याने नागपूरच्या सत्र न्यायालयाने जाधव यांना अटक करण्याचे आदेश दिले होते
- गेल्या सोमवारी जाधव न्यायालयात हजर झाले त्यावेळी न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिला होता
- याप्रकरणी काल झालेला सुनावणीत सत्र न्यायाधीश यांनी जाधव यांना सशार्त जामीन मंजूर केला
21 Feb 2025, 07:48 वाजता
दहावीची बोर्डाची परीक्षा आजपासून: 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. झी 24 तास डॉट कॉमकडून सर्व विद्यार्थ्यांना All the Best!