Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE 19 February 2025 in Marathi:<Summery>महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. वाचा राजकारण, मनोरंजन, कला, क्रीडा, व्यवसाय, गुन्हेगारी वृत्त, या आणि अशा विविध क्षेत्रातील तसेच, मुंबई-महाराष्ट्रासहीत देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी. बातम्यांचे वेगवान LIVE अपडे्स फक्त झी २४ तास वर...   

Feb 19, 2025, 17:59 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

19 Feb 2025, 17:51 वाजता

धनंजय मुंडेंनी खोटं बोलून GR काढलेत - दमानिया

 

Anjali Damania On Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. मुंडेंनी खोटं बोलून जीआर काढल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केलाय.. त्यामुळे मुंडेंची मंत्रिपदावर राहण्याची पात्रता नाही.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अंजली दमानियांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Feb 2025, 17:47 वाजता

शिवरायांबाबत किती आस्था हे दिसलं - प्रवीण दरेकर

 

Pravin Darekar On Rahul Gandhi : राहुल गांधींनी केलेल्या पोस्टमुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.. राहुल गांधींना शिवरायांबाबत किती आस्था आहे हे दिसून आलं असल्याचं म्हणत शिवभक्त काँग्रेसला मुळासकट उखडुन टाकतील, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी दिलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Feb 2025, 16:48 वाजता

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

 

Pune Police : पुण्यातील कर्मचारी सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी जात असताना चार जणांनी दारू पिऊन पोलिसाला मारहाण केलीय. शहरातील सेनापती बापट मार्गावर ही घटना घडलीय. चार व्यक्ती दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत होते. पोलिसाने त्यांना जाब विचारला. मात्र या दारुड्यांनी पोलिसालाच मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. त्यांच्या एका साथिदारांचा शोध सुरूये. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Feb 2025, 16:08 वाजता

अभिनेता अक्षय कुमारचं नवं गाणं वादात

 

Akshay Kumar : अभिनेता अक्षयकुमारवर चित्रित करण्यात आलेलं महाकाल चलो गाणं वादात सापडलं आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिर, महाकाल लोक आणि शिप्रा नदीवर आधारित हे गाणं आहे. यामध्ये भक्तीत लीन अक्षयकुमारनं शिवपिंडीला मिठी मारल्याचं दाखवलं आहे. त्याला अखिल भारतीय पुजारी महासंघानं आक्षेप घेतला आहे. गाण्यात पिंडीवर अभिषेक होत असताना, पिंडीला कवटाळलेल्या मनुष्यावरही पंचामृताचा अभिषेक होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचं पुजारी महासंघानं सांगितलंय. 

19 Feb 2025, 14:16 वाजता

'2019ला शिंदेंना CM करावं, ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचा दावा

 

Sanjaya Raut : भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार होता असा दावा खासदार संजय राऊतांनी केला . भाजपने शब्द पाळला नाही म्हणून युती सरकार आलं नाही आणि शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत असं संजय राऊत म्हणाले.तसंच अजित पवार, शरद पवार यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते असंही राऊतांनी म्हटलं

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 13:27 वाजता

राहुल गांधींचं शिवरायांबाबतचं ट्विट वादात 

 

 Rahul Gandhi Tweet : राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना चुकीच्या शब्दाचा वापर केलाय. त्यावरून भाजप आक्रमक झालीय.. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि पोस्ट डिलिट करावी अन्य़था कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 13:03 वाजता

शिवसेना UBTचे सर्व नेते बीड दौऱ्यावर जाणार

 

Sanjay Raut : बीड प्रकरणात आता शिवसेना UBT पक्ष लक्ष घालणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. सुरेश धसांसह प्रमुख नेते आवाज उठवत होते...मात्र सगळा घोटाळा होता असा आरोप राऊतांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेनेचे सर्व नेते बीड दौ-यावर जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यानंतर उद्धव ठाकरेही बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 12:31 वाजता

शंभूराजांचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही- मुख्यमंत्री

 

CM Fadnavis on Kamal Khan : शंभूराजांचा अपमान करणा-यांना माफ करणार नाही.. त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. शिवप्रेमीही शंभूराजांचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.. मुख्यमंत्र्यांनी कमाल खाननं विकिपीडियावरील शंभूराजांबाबतची माहिती खरी असल्याचं सांगून ती पोस्ट केलीय.. झी 24 तासनं कमाल खानवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कमाल खानला इशारा दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 11:40 वाजता

गळती रोखण्यासाठी शिवसेना UBT पक्ष सज्ज

 

Shivsena UBT : शिवसेना UBT पक्षाने डॅमेज कंट्रोल गांभीर्याने घेतलंय... गळती रोखण्यासाठी शिवसेना UBT पक्षाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतलीय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणारेय. तसंच पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणारेत...शिवसेना UBT पक्षाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार असून शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेणारेत.ठाकरेंच्या शिवसेना पक्षात येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

19 Feb 2025, 11:21 वाजता

डान्स बार बंदी कायदा आणखी कडक होणार

 

Dance bar : डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे.. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र, आयत्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसुद्यात सुधारणा करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना केल्या.
सुप्रीम कोर्टानं डान्स बारसंदर्भात अलीकडेच काही निर्देश दिले. त्या आड डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत... त्याला रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. कोर्टाच्या निर्देशांचा सखोल अभ्यास करून कायद्याचा मसुदा नव्याने आणा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मसुद्याला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सुधारित विधेयक विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.