लग्नात डीजेवर धरला ठेका, नाचताना तरुणाचा धक्का लागल्यानंतर 12 वर्षांच्या मुलाने जे केलं ते धक्कादायक

Nagpur Murder​ : एक धक्कादायक बातमी. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पुढे आले आहे.  

Updated: Apr 30, 2022, 12:09 PM IST
लग्नात डीजेवर धरला ठेका, नाचताना तरुणाचा धक्का लागल्यानंतर 12 वर्षांच्या मुलाने जे केलं ते धक्कादायक

नागपूर : Nagpur Murder : एक धक्कादायक बातमी. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पुढे आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव राहुल गायकवाड असून गुरुवारी रात्री काटोल मधील अण्णाभाऊ साठे नगरात एका लग्नात लावलेल्या डीजेवर नाचण्याच्या वादातून ही घटना घडली आहे.

12 वर्षीय मुलगा आणि राहुल गायकवाड लग्नातील डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर 12 वर्षीय मुलाने त्याच्याकडील चाकूने राहुल वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुला आधी काटोलच्या स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नागपुरातील मेयो शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी काल त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी हत्येचे प्रकरण दाखल करत 12 वर्षीय बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.