'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनार जवळची मैत्रिण बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालने भावूक पोस्ट केलीय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 10, 2024, 11:05 AM IST
'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण जग दुःख व्यक्त करत आहे. प्रसिद्ध उद्योजक असलेले रतन टाटा कायमच आपल्या कृतीतून प्रत्येकाला आपल्या जवळचे वाटले. रतन टाटा यांनी बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनाही रतन टाटा यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मित्र अचानक त्यांचा निरोप घेईल, हे कुणाला माहीत नव्हते. 

सिमी गरेवाल यांनी त्यांच्या X ट्विटर हँडलवर रतन टाटा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. रतन टाटा काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये गेले होते आणि त्यांनी त्यामध्ये त्यांच्या जीवनाबद्दल मनोरंजक खुलासे केले होते.

सिमी ग्रेवाल यांची भावनिक पोस्ट 

फोटो शेअर करत सिमी ग्रेवालने लिहिले की, 'ते म्हणतात की तू गेलास. तुझे जाणे स्वीकारणे खूप कठीण आहे. अलविदा माझ्या मित्रा... #RatanTata असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

सिमी ग्रेवाल-रतन टाटा यांचं नातं 

सिमी ग्रेवाल यांचे एके काळी रतन टाटा यांच्यावर खूप प्रेम होते. 2011 मध्ये एका मुलाखतीत सिमी ग्रेवाल यांनी हे मान्य केले होते. सिमी ग्रेवाल यांना रतन टाटा यांच्याशी असलेल्या संबंधाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने काही काळ रतन टाटा यांना डेट केले होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले, परंतु ते नेहमीच चांगले मित्र राहिले.

(हे पण वाचा - बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?) 

सिमी ग्रेवाल यांनी रतन टाटा यांच्यासाठी लिहिलेली ही खास पोस्ट अतिशय महत्त्वाची आहे. जवळच्या व्यक्तीचं जाणं आणि त्यावेळी व्यक्त केलेल्या भावना या मनाला चटका लावून जातात.