Shocking News : आज 21 व्या शतकातही पुरुषी मानसिकता कायम आहे. कितीही कायदे केले तरी महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पतीने पत्नीला मारहाण करताना क्ररतेच्या सर्व सीमा पार केल्या. धक्कादायक म्हणजे या राक्षसी कृत्यात त्याला त्याच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जेवणात केस आढळल्याने संतापला
बिहारमधल्या पिलीभीतमध्ये राहणाऱ्या या महिलेने पतीला जेवण वाढलं, जेवत असताना त्याच्या जेवणात केस आढळला. बस या एक या गोष्टीवरुन त्याचा संताप अनावर झाला. नराधन पतीने आधी तिला शिवीगाळ केली. त्यानतर तिला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर तिचे हात पाय बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानतंर तिच्याबरोबर शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. 

पतीच्या कुटुंबियांचीही साथ
धक्कादायक म्हणजे हे सर्व घडत असताना त्याला त्याच्या घरच्यांनीही साथ दिली. दिर आणि सासूने त्याला अडवण्याऐवजी त्याला आणखी भडवण्याचा प्रयत्न केला. क्रुरतेचा कळस म्हणजे या सर्वांनी मिळून तिचे केस कापले आणि तिचं टक्कल केलं. घडलेला सर्व प्रकार महिलेने आपल्या माहेरी सांगितला. त्यानंतर जाब विचारण्यासाठी आलेल्या महिलेच्या माहेरच्यांनाही मारहाण करण्यात आली. 

हे ही वाचा : ऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

महिलेने केली पोलिसात तक्रार
या घटनेबद्दल पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माहेरुन पैसे आणण्यासाठी सातत्याने छळ केला जात होता, यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचं महिलने सांगितलं. याप्रकरणी पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
crime news hair come out in food husband made wife bald shocking
News Source: 
Home Title: 

Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती

Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

जेवणात केस आढळल्याने संतापला

पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा

पतीच्या कृत्यात सासरच्यांही पाठिंबा

Mobile Title: 
नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, December 10, 2022 - 21:08
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No