वडिलांची आत्मा, मध्यरात्री केलेले तंत्र-मंत्र अन्...; 11 जणांच्या आत्महत्येचं गूढ असं उलगडलेलं!

Burari Case In Marathi: बुरारी हत्याकांडाचे तीव प्रडसाद संपूर्ण देशभरात उडाले होते. काय घडलं होतं नेमकं? वाचा

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 20, 2025, 02:21 PM IST
वडिलांची आत्मा, मध्यरात्री केलेले तंत्र-मंत्र अन्...; 11 जणांच्या आत्महत्येचं गूढ असं उलगडलेलं!
5 years of burari mass suicide case bhatia family 11 member found dead in house

Burari Case In Marathi: 1 जुलै 2018 रोजी दिल्लीतील गजबजलेल्या ठिकाणी राहत असलेले सधन कुटुंब. खेळीमेळीने वावरणाऱ्या या कुटुंबाला परिसरात मान होता. मुळ राजस्थानच्या चित्तोडगढ येथील हा परिवार 20 वर्षांपूर्वी दिल्लीत येऊन वसले आणि तिथलेच रहिवाशी झाले. या कुटुंबाला भाटिया कुटुंब म्हणूनही रहिवाशी ओळखू लागले. 

या कुटुंबातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे नारायण देवी त्यांचे वय 77 वर्षे आहे. त्यांना तीन मुलं होते. यातील सर्वात मोठा मुलगा राजस्थानात राहत होता. तर दोन मुलं नारायणी देवींसोबत बुरारीमध्ये राहत होते. मोठ्या मुलाचे नाव भुवनेश भाटिया आणि धाकट्या मुलाचे नाव ललित भाटिया असं होतं. भुवनेशच्या पत्नीचे नाव सविता आणि त्यांना तीन मुलं होती. मेनका, नीतू आणि ध्रुव. तर, ललितच्या पत्नीचे नाव टीना असं होतं. त्यांना एक मुलगा होता शिवम. या व्यतिरिक्त नारायणी देवी यांना एक मुलगीदेखील होती. तिचं नाव प्रतिभा असं होतं. पतीच्या मृत्यूनंतर प्रतिभा तिची मुलगी प्रियंकासह बुरारी येथेच राहत होती. प्रियंका एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करायची आणि घटनेच्या 15 दिवस आधीच तिचा साखरपुडा झाला होता. 

1 जुलै 2018 रोजी भुवनेश भाटिया यांनी त्यांचे दुकान उघडले नाही. इतरवेळी दररोज सकाळी पाचच्या सुमारास ते दुकान उघडायचे. त्यामुळं सवयीप्रमाणे काही ग्राहक त्यांच्या दुकानात आले मात्र दुकान बंद असल्याने ते आश्चर्यचकित झाले. दुकान घराच्या खालीच ग्राउंड फ्लोरवर होते. मात्र बराच वेळा झाला तरी घरातून कोणीच प्रतिसाद दिला नाही. अनेकांनी त्यांना फोन केले मात्र फोनदेखील उचलले नाहीत. 

शेजाऱ्यांनी अखेर त्यांच्या घरी जावूनच काय झालंय नेमकं हे पाहण्याचे ठरवले. मात्र घरात पहिले पाउल टाकताच ते हादरले. शेजारी किंचाळत घराबाहेर पडले. घरात 11 लोकांचे मृतदेह पडले होते. 9 लोकांनी छताच्या ग्रिलला गळफास घेतला होता तर एका महिलेने खिडकीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. तर, घरातील वयस्कर महिलेचा मृतदेह देवघरात पडला होता. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. 

पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील स्थिती पाहून त्यांनाही धक्काच बसला. संपूर्ण भाटिया कुटुंब मृत पावलं होतं. छतावर फक्त त्यांचा पाळीव कुत्रा टॉमी बांधून ठेवला होता आणि तो जोरजोरात भूकंत होता. सुरुवातीला दरोडा किंवा चोरीच्या उद्देषाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र घरातून कोणतेच सामान गायब झाले नव्हते त्यामुळं नंतर आत्महत्या म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. 

पोलिसांनी घराची झाडझडती घेतली तेव्हा घरात एक डायरी सापडली आणि तपासाची दिशाच भरकटली. या डायऱ्यांमध्ये पूजा पाठ आणि होम-हवनबाबत लिहिण्यात आले होते. या सर्व बाबी वेगवेगळ्या हस्ताक्षरात लिहले गेले होते. त्यामुळं घरातील सदस्य रोज या डायरी लिहित होते. या डायरीत एका प्रथेचे पालन करण्यास सांगितले होते. घरातील सर्व 11 जणांनी ही प्रथा पाळावी त्यामुळं सगळ्या समस्या दूर होतील आणि मोक्ष मिळेल, असं लिहलं होतं. 

या डायरीत अनेक विचित्र गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. त्याचा अर्थ हाच निघत होता की सर्व जण शरीराचा त्याग करण्याची प्रक्रिया करत आहेत. मात्र त्यात असं लिहलं होतं की, तुम्ही मरणार नाही घराचे प्रमुख भोपाल चुंडावत ज्यांचे 2007 साली निधन झाले ते तुम्हाला वाचवतील तसंच तुम्हाला दर्शनदेखील देतील. पोलिसांच्या मते हे कुटुंबा डायरीत लिहलेल्या गोष्टी फॉलो करायचे आणि मानायचे देखील. पोलिस जेव्हा नातेवाईंकासोबत बोलले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे कुटुंब धार्मिक आहेत. कोणासोबतही त्यांची दुश्मनी नव्हती. पोस्टमार्टममध्ये समोर आले की हे एक मास सुसाइड आहे. कुटुंबात सर्वात उशीरा मृत्यू नारायणी देवी यांचा झाला होता. मात्र त्यांना विषारी पदार्थ देऊन मारण्यात आले होते. 

पोलिसांनी काय म्हटलं?

2007 मध्ये कुटुंबप्रमुख भोपाल दास यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा लहान मुलगा ललित यांच्यावर त्यांच्या मृत्यूचा खोलवर परिणाम झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो शांत राहू लागला आणि विचित्र वागू लागला. माझ्यात भोपालदास यांची आत्मा येते, असं तो सतत कुटुंबाला सांगत होता. सुरुवातीला कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि जेव्हा घराची आर्थिक स्थिती खालावली तेव्हा ललितने घराचा भार उचलला आणि आर्थिक स्थिती पूर्ववत केली. त्याने म्हटलं की , भोपाल दास माझ्या स्वप्नात येतात त्यांनीच मार्गदर्शन केले. त्या घटनेनंतर कुटुंबीय त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. 

एक दिवस ललितने पत्नी टीनासह घरातील लोकांना घरात एक विधी करायला सांगितला. हा विधी केला तर भोपाल दास त्यांना दर्शन देतील आणि त्यांच्या चुका माफ करतील. तसंच, त्यांना मोक्ष प्राप्तीदेखील होईल. घरातील सर्वचजण या विधीसाठी तयार झाले. 30 जूनला रात्री 12 ते 1 या दरम्यानच हा विधी केला गेला पाहिजे, असं ललितने सांगितलं. सर्वांचे हात-पाय बांधले गेले आणि डोळे बंद करण्यात आले. तोंडात कपड्याचा बोळा टाकण्यात आला. सर्वांना एक आवाज येईल तेव्हाच भोपाळ दास त्यांना दर्शन देतील. मात्र तेव्हा त्यांनी घाबरुन जावू नये. कारण भोपाळ दास त्यांना वाचवतील, असं त्यात लिहिण्यात आले होते. 

संपूर्ण कुटुंब ललितच्या बोलण्यात आले त्यांना माहिती होतं यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो मात्र तरीही ते तयार झाले. ललितने त्यांच्या डोक्यात भरवले होते की भोपाल दास त्यांना वाचवतील. हा विधी करण्यासाठी त्यांनी 6 दिवस प्रॅक्टिसदेखील केली होती. तसंच, पाळीव कुत्रादेखील छताला बांधून ठेवला होता. 1 जुलै 2018 रोजी या घटनेची माहिती समोर आली होती.