2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले ISRO ला टार्गेट

2035 पर्यंत भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन तयार करा. 2025 मध्ये गगनयानद्वारे मानवाला अवकाशात पाठवा असे टार्गेटच  PM मोदी यांनी ISRO ला दिले आहे. 

Updated: Oct 17, 2023, 05:35 PM IST
2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले  ISRO ला टार्गेट

ISRO : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली. आदित्य L1 ही मोहिम देखील यशस्वी टप्प्यात आली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संस्था ISRO ने गगनयान मोहिनेवर लक्ष केंद्रित केले आहे. 2035 भारताचे स्वत:चे अंतराळ स्टेशन असले पाहिजे. तसेच 2040 पर्यंत मानव चंद्रावर असला असे टार्गेटच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO ला दिले आहे.

गगनयान मोहिमेची जय्यत तयारी

चांद्रयान 3 आणि सूर्यावरील मिशन आदित्यच्या यशानंतर आता इस्रोनं आणखी एक नवी भरारी घेण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण येत्या 21 ऑक्टोबरला होणार आहे. एलव्हीएम ३ या अग्निबाणाच्या मदतीनं गगनयान मोहीम राबवली जाणाराय, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. 21 ऑक्टोबरला गगनयान मॉड्युल अंतराळात लाँच केलं जाईल. ते आऊटर स्पेसपर्यंत पाठवण्यात येईल. त्यानंतर ते पुन्हा जमिनवर परतेल. बंगलाच्या खाडीत त्याच्या रिकव्हरीसाठी इस्रो भारतीय नौदलाची मदत घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आढावा बैठक

ISRO च्या टीम कडून गगनयान मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. 21 ऑक्टोबर रोजी भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील 'गगनयान' च्या क्रू एस्केप सिस्टमच्या चाचणीच्या तयारीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आली. अंतराळ विभागाने या बैठकीत गगनयान मोहिमेबाबत सविस्तर माहिती पंतप्रधान मोदी यांना दिला. या मोहिमे अंतर्गत  ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल (HLVM3) च्या 3 uncrewed मिशनसह सुमारे 20 प्रमुख चाचण्या नियोजित करण्यात आल्या आहेत. क्रू एस्केप सिस्टम चाचणी वाहनाचे पहिले प्रात्यक्षिक उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास, अंतराळवीरां सुरक्षितपणे पृथ्वीवर  कसे आणणार?

21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत 'गगनयान' मिशनच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास, अंतराळवीरां सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची ही चाचणी असणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मिशन लाँच होईल.मिशन-1 (TV-D1) प्रक्षेपित केले जाणार आहे. - अ‍ॅबॉर्ट मिशनसाठी बनवलेले सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम असे या उड्डाणाचे तीन भाग असणार आहे.  

PM मोदी यांनी दिले  ISRO ला टार्गेट 

या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ISRO च्या टीमला टार्गेट दिले.  2035 पर्यंत भारताने 'इंडियन स्पेस स्टेशन' (ISS) ची स्थापना करावी.  2040 पर्यंत भारताने चंद्रावर मानव पाठवावे असे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ISRO च्या टीमने काम करावे असे निर्देश दिले.