या बॉलिवूड अभिनेत्री लिव इनमध्ये एकासोबत, लग्न दुसऱ्यासोबत

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं  करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि योग्य लाईफ पार्टनर निवडत लग्न करुन सुखी संसार करत आहे.

Updated: Jul 30, 2021, 06:05 PM IST
 या बॉलिवूड अभिनेत्री लिव इनमध्ये एकासोबत, लग्न दुसऱ्यासोबत

मुंबई : फिल्म इंडस्ट्री म्हटलं की ग्लॅमरस लाईफस्टाईल आलीचं. स्टार्सच्या ऑन स्क्रिन लाईफसोबतच त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी देखील चांगल्याच चर्चेत असतात. त्याचं नाते, जीवनशैली आणि लग्नापासून ते फोटोशूटपर्यंत हे स्टार्स प्रेक्षकांच्या चर्चांचा विषय बनतात. प्रसिद्धी मिळताच त्यांची पर्सनल लाईफदेखील तितकीच जवळून पाहिली जाते. 

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं  करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि योग्य लाईफ पार्टनर निवडत लग्न करुन सुखी संसार करत आहे. पण लग्नापूर्वी काही अभिनेत्री अशा आहेत , ज्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव इन रिलेशनशिप राहत होत्या. ज्यांची खूपच चर्चा देखील होती.

ऐश्वर्या राय बच्चन - सलमान खान

ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यातील संबंधांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की,  करिअरच्या सुरुवातीला ऐश्वर्या सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा सलमान आणि ऐश्वर्या एकत्र राहत होते. ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबातील एकुलती एक सून आहे आणि तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आहे.

बिपाशा बासू - जॉन अब्राहम

अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता जॉन अब्राहम यांचं नात देखील चर्चेत होते. दोघेही एकमेकांसोबत लिव-इन रिलेशनमध्ये राहत होते.  वाईट काळात या दोघांनीही एकमेकांची साथ दिली नाही आणि त्यानंतर ते वेगळे झाले. सध्या दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.

करीना कपूर- शाहिद कपूर

 करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे नातेसंबंध देखील लोकांमध्ये चांगलच चर्चेत होतं. करीना आणि शाहिद हे सिरिअस रिलेशनशीपमध्ये होते. आणि दोघांनी लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचं नात जास्त काळ टिकू शकलं नाही, ब्रेकअपनंतर करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले, तर शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले.

प्रियंका चोप्रा-शाहिद कपूर

 प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूरच्या लिव-इन रिलेशनची चर्चा तेव्हा सुरु झाली, जेव्हा शाहिद कपूरने प्रियांकाच्या घरी आयकर टीम विभागाची टीम पोहोचली होती. यावेळी शाहिदने प्रियांकाच्या घराचा दरवाजा उघडला.