'मी वारस देऊ शकली नाही...', स्मृती ईराणींच्या आईनं 3 मुलींसोबत सोडलं होतं घर; 41 वर्षांनंतर घर खरेदी करायला गेल्यावर...

Smriti Irani Struggle : स्मृती ईराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 21, 2025, 11:18 AM IST
'मी वारस देऊ शकली नाही...', स्मृती ईराणींच्या आईनं 3 मुलींसोबत सोडलं होतं घर; 41 वर्षांनंतर घर खरेदी करायला गेल्यावर...
(Photo Credit : Social Media)

Smriti Irani Struggle : लोकप्रिय अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती ईरानी टेलिव्हिजनमध्ये गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. स्मृती ईरानी यांच्या विषयी बोलायचं झालं तर त्याची सुरुवात 'आतिश' आणि 'हम हैं कल आज और कल' नं झाली होती. तर त्यांना खरी ओळख ही 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतील तुलसी या भूमिकेमुळे मिळाली होती. स्मृती यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांचं लग्न 2001 मध्ये झालं. स्मृती ईरानी यांना दोन मुलं आहेत, जोहर आणि जोइश. त्याशिवाय स्मृती ईरानी यांना सावत्र मुलगी आहे. ती त्यांचा नवरा जुबीन यांच्या पहिल्या लग्नातील मुलगी आहे. 

बालपणी केलेल्या संघर्षांविषयी बोलायचं झालं तर स्मृती ईरानी यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळाविषयी सांगितलं आहे. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलं की 'आज मला या सगळ्यात माझ्या आईनं सांगितलेला एक किस्सा आठवला. मी 48 वर्षांची आहे. येणाऱ्या मार्चमध्ये मी 49 वर्षांची होणार. पण जेव्हा मी सात वर्षांची होते तेव्हा एक दिवस मला आणि माझ्या दोन छोट्या बहिणींना एका ताटात भात आणि काळी डाळ जेवणासाठी देण्यात आली होती.'

स्मृती यांनी पुढे सांगितलं की 'आम्ही तिघं एका रुमममध्ये बसून डाळ-भात खात होतो आणि अचानक घरात एक एमरजंसी आली. आम्हाला तिघांना हे माहित नव्हतं की अचानक इतकी एमरजेंसी कशी काय आली. इतक्यात आई एका रुममधून आली आणि म्हणाली की तुमचं जेवण झालं का? आम्ही हो म्हणालो आणि त्यावेळी मी सात वर्षांची होते. माझ्याहून माझी लहाण बहीण ही पाच वर्षांची होती आणि सगळ्यात छोटी ही दोन वर्षांची होती. मी सगळ्यात मोठी असल्यानं जशी संधी मिळाली तसं मी आईला विचारलं की आम्हाला काय करायचं आहे, कारण आज रविवार आहे. तर तिनं सांगितलं तुमच्या बॅग्स पॅक झाल्या आहेत आणि तुम्ही तिघी माझ्यासोबत येत आहात.'

स्मृती ईरानी म्हणाल्या, 'मला आठवण नाही की मी त्यांना विचारलं की नाही की आमच्या बॅग्स का पॅक आहेत? पण हो मला इतकं नक्की माहित आहे की मी तिला एका रिक्षात बसल्याचं पाहिलं. तिच्यासोबत सिलेंडर, 2 मुली आणि बॅग्स होते आणि ते माझी वाट पाहत होते. मी घराच्या बाहेर उभी होते आणि मी विचारलं की आपण इथून का जातोय. आईनं सांगितलं की आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. फक्त इतकं सांगेन की मी त्यांना एक मुलगा देऊ शकले नाही तर इथून चला. घर बनवूया. मी घराच्या बाहेरच उभी होते आणि माझी आई मला सांगत होती की चल आता इथून.'

पुढे स्मृती यांनी सांगितलं की 'माझी आई मला विचारत होती की तू या घराकडे का पाहतेस? मी म्हटलं की एक दिवस मी हे घर खरेदी करणार आहे. त्यावेळी माझ्या आईच वय हे 30 च्या जवळपास असेल. ती तिच्या सात वर्षांच्या मुलीकडे पाहत होती आणि विचार करत होती की हे काय होतंय. जिला हे सुद्धा माहित नाही की तिचं भविष्य काय आहे आणि कसं असेल. आईनं माझा हात धरला आणि आम्ही तिथून निघालो. आम्ही दिल्लीला आलो. त्यावेळी मी दोन-तीन नोकऱ्या एकत्र केल्या आणि एक दिवस माझ्याकडे इतका पैसा आला की मी ते खरं खरेदी करण्याचा विचार केला.' 

हेही वाचा : 'गोविंदाला मूर्ख लोक आवडतात; तो 4 मूर्खांसोबत बसतो अन् नंतर...', पत्नी सुनीता स्पष्टच बोलली

घर खरेदी करण्याविषयी बोलताना स्मृती म्हणाल्या, 'मी त्या घराच्या बाहेर उभी होते आणि आईला तिथून फोन केला. मी म्हणाले की 41 वर्षांपूर्वी आपण जी जागा सोडली होती मी तिथेच उभी आहे. मी घर खरेदी करण्यासाठी इथे आले. आई हुशार असते आणि वयानुसार ती जास्त हुशार होते. तिनं मला विचारलं की मला खरं-खरं सांग, तुला खरंच ते घर खरेदी करायचं आहे. मी त्या घराला पाहिलं आणि हा देखील विचार केला की माझ्या पाकिटात इतके पैसे आहेत की मी हे घर खरेदी करु शकते पण मी ते खरेदी केलं नाही. आई म्हणाली की दुसऱ्यांना माफ करायला शिक. तुझ्या रागाला कमी कर. त्या लोकांना माफ करायला शिक ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केलं आहे. हेच तुझ्यासाठी सगळ्यात योग्य आणि चांगली भेट असेल.'