सावनी रविंद्रने शेअर केली Good News

सुंदर फोटो शेअर करत दिली ही आनंदाची बातमी 

Updated: May 30, 2021, 07:23 AM IST
सावनी रविंद्रने शेअर केली Good News

मुंबई : लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने (Savaniee Ravindra) नुकतीच एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सावनीच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन होणार आहे. गायिका सावनी रविंद्र सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली आहे. 

नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. नुकतंच सावनीनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. सावनीनं डोहाळे जेवणाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Savaniee Ravindrra (@savanieeravindrra)

सावनीन पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. सावनीने 2018 साली डॉक्टर आशिष धांडेशी लग्न केलं. सावनीने आपले बेबी बम्पसह सुंदर फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.

सावनी या गोड बातमी विषयी भावना व्यक्त करताना सांगते, ‘’माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी सावनीला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याकडून सावनीने गायनाचे धडे घेतले आहेत. सावनीने दिलेल्या या गोड बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.