राजकुमार यांनी एका झटक्यात सलमान खानच्या डोक्यात गेलेली हवा बाहेर काढली

चित्रपटाच्या यशानंतर सलमान खान एका रात्रित स्टार बनला

Updated: Apr 29, 2021, 03:07 PM IST
राजकुमार यांनी एका झटक्यात सलमान खानच्या डोक्यात गेलेली हवा बाहेर काढली

मुंबई : बॉलिवूडच्या दबंग सलमान खानची प्रसिद्धी आणि बरेच किस्से आहेत. बॉलिवूडमध्ये तो भाईजान म्हणून ओळखला जातो. मात्र त्यांची एक कहाणी आहे जी. त्याच्या प्रसिद्धी आणि त्याला मिळालेल्या लवकर यशाशी संबंधित आहे. या किस्सामध्ये त्याचा अभिनेता राजकुमारशी समोर झाला आहे. ज्यानंतर सलमान खानचा अ‍ॅटिट्यूड जास्तच वाढत गेला. हा किस्सा मैने प्यार किया या सिनेमाशी संबंधित आहे. यामध्ये अभिनेता राजूकमार आणि सलमान खान यांच्यातील बातचित बिघडली आहे. यानंतर यानंतर या दोघांमध्ये भांडण झालं.

चित्रपटाच्या यशानंतर सलमान खान एका रात्रित स्टार बनला. त्यानंतर या सिनेमाची यशस्वी पार्टी आयोजित केली होती. चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांच्यासोबत अभिनेता राजकुमार यांनाही या पार्टीमध्ये आमंत्रित केले होतं. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये सलमानने ड्रिंक केलं होतं. या काळात त्याला ड्रग्सची देखील चटक लागली होती. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्येही तो खूप नशेत होता.

यानंतर जेव्हा अभिनेता राजकुमारची ओळख करुन देण्यासाठी बडजात्या यांनी सलमान खानला बोलावलं. पण सलमानने राजकुमारकडे दुर्लक्ष केलं आणि विचारले तू कोण आहेस. यानंतर राजकुमार चिडला आणि कानाखाली मारत सांगितलं की, तुझ्या बापाला जाऊन विचार मी कोण ते... हे ऐकल्यावर सलमान खानचा सगळा माज उतरला.