Watch Video Sunita Williams Butch Wilmore Spacwalk : नासाच्या विविध अवकाश मोहिमा सातत्यानं सुरु असून, फक्त पृथ्वीवरच नव्हे, तर अवकाशातही नासाच्या काही अंतराळवीरांनी या संशोधनांच्या माध्यमातून विविध मोहिमांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स हेसुद्धा त्याच यादीतलं नाव.
जून 2024 मध्ये एका मोहिमेसाठी म्हणून अवकाशात आठ दिवसांसाठी गेलेल्या विलियम्स काही तांत्रिक कारणांमुळं तिथं अडकल्या. पण, हा काळही त्यांनी सन्मार्गी लावल्याचं पाहायला मिळालं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर उपस्थित अंतराळवीरांना त्यांच्या मोहिमेत हातभारही लावला. याच सुनीता विलियम्स आणि त्यांच्यासमवेत ISS वर असणाऱ्या बुच विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांनी नुकताच एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला.
गुरुवारी अंतराळवीरांची ही जोडी International Space Station (ISS) मधून बाहेर आल्यानंतर त्यांनी तब्बल 5.5 तासांसाठी स्पेसवॉक करत एक विश्वविक्रम आपल्या नावे केल्याची माहिती अमेरिकेच्या स्पेस एजन्सीकडून देण्यात आली. नासाच्या माहितीनुसार हा विलियम्स यांचा नववा आणि विल्मोर यांचा पाचवा स्पेस वॉक ठरला. या स्पेसवॉकमध्ये त्यांनी काही प्राथमिक उद्दिष्ट साध्य केल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटीना काढत, परीक्षणासाठी पृष्ठावरील काही नमुने Destiny laboratory मधून सोबत घेतल्याची माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं किली.
LIVE: @NASA_Astronauts Suni Williams and Butch Wilmore are taking a spacewalk to maintain @Space_Station hardware and collect samples. Today's spacewalk is scheduled to start at 8am ET (1300 UTC) and go for about 6.5 hours. https://t.co/6pvzcwPdgs
— NASA (@NASA) January 30, 2025
ISS च्या X अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी या स्पेसवॉकसह पेगी विट्सन यांचा एकूण 60 तास 21 मिनिटांच्या स्पेसवॉकचा विक्रम मोडला. दरम्यान, एकिकडे विलियम्स यांनी हा विक्रम रचलेला असतानाच दुसरीकडे नासा एलॉन मस्कच्या साथीनं अवकाशात अडकलेल्या अंतराळवीरांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. विल्मोर आणि विलियम्स हे नासाचे अंतराळवीर Boeing's Starliner च्या माध्यमातून अवकाशात गेले होते. सुरुवातीला त्यांचा हा मुक्काम अवघ्या 8 दिवसांचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळं त्यांच्या परतीच्या प्रवासात अडचणी आल्या. ऑगस्ट महिन्यातच नासानं हे अंतराळवीर फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार असल्आचं सांगिचलं होतं, तेव्हा आता त्यांच्या परतीकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.