[field_breaking_news_title_url]

Hands Legs Tingling : विविध आजारांसोबतच हात-पायांवर मुरुम येणे ही सर्वत्र सामान्य समस्या बनली आहे. बर्‍याच वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यास शरीराच्या अवयवांमध्ये संवेदना होण्याची समस्या उद्भवते. हा त्रास जर सारखा होत असेल तर किंवा तुमच्या शरीरात वारंवार हाता-पायाला मुंग्या येत असेल तर ते एखाद्या मोठ्या आजाराचे कारण बनू शकते.

Section: 
Image: 
तुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात? मग चुकूनही दुर्लक्ष करु नका आजार!
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Tingling in Hands & Feet Causes Diagnosis and tips
Add Story: 
Image: 
Caption: 
अनेकदा खूप वेळ बसल्यानंतर पायाला किंवा हाताला गुदगुल्या होतात किंवा संवेदना येतात. याला बरेच लोक याला मुंगी चावणे असेही म्हणतात. परिणामी शरीरात मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते.
Image: 
Caption: 
खूप वेळ एकाच स्थितीत बसल्याने मुंग्या येणे हे तर नेहमीचेच आहे. मात्र सतत जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण आहे.
Image: 
Caption: 
जर तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या असेल तर तुम्ही चाचणी करून घ्या. तुमच्या आहारात ज्या जीवनसत्त्वांची कमतरता असेल त्यावर लक्ष देत योग्य तो आहार घ्या.
Image: 
Caption: 
शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणात व्हिटॅमिन बी असतात. जर तुम्ही मांसाहार खात असाल तर तुमच्या आहारात मांस, मासे, चिकन यांचा समावेश करा.
Image: 
Caption: 
त्याउलट जर शाकाहारी असाल तर तुम्ही संपूर्ण धान्य, बीन्स, मसूर, बटाटे किंवा सुका मेवा घेऊ शकता. हे सर्व ब जीवनसत्त्वांचे चांगले स्रोत आहेत. दुग्धजन्य पदार्थांमधूनदेखील व्हिटॅमिन बी चांगले मिळते.
Image: 
Caption: 
ड्राय फ्रुट्स किंवा सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय आहारात अॅवोकॅडोचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत असतो.
Image: 
Caption: 
त्याचप्रमाणे बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात असते. सूर्यफूल बिया आणि तेल देखील व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत असतात.