घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना आता शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि शंभर कोटी दंड आणि अजून वाढण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे कारावास आणि पाच लाख दंड अजून वाढण्याची शक्यता असून राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी यांना प्रत्येकी चाळीस कोटी दंड आणि सात वर्षे कारावास ठोठावण्यात आला आहे. तर आरोपी सहा ते पंधरा यांना चार वर्षे कारावास आणि ४३ ते ५१ एक लाख दंड तसेच सात वर्षे चार आरोपींना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. या निकालावर वकील समाधानी नाहीत. ते जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत, अशी माहिती वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.
जळगाव । घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड
