आसाराम बापूंना १४ दिवसांची कोठडी
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
Sep 2, 2013, 06:19 PM ISTबापूंना घेऊन पोलीस जोधपूरमध्ये, परिसरात कडक बंदोबस्त!
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले आणि इंदूरहून अटक झालेल्या आसाराम बापूंना घेऊन पोलीस जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास इंदूरहून ते विमानानं दिल्लीत पोहोचले. तिथं दोन तास थांबल्यानंतर दुसऱ्या विमानानं आसाराम बापूंना घेऊन पोलीस जोधपूरला पोहोचले.
Sep 1, 2013, 01:16 PM ISTइंदूरहून व्हाया दिल्ली जोधपूरला रवाना आसाराम बापू!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना इंदूरहून अटक केल्यानंतर आता व्हाया दिल्ली जोधपूरला घेऊन जातायेत. त्यादरम्यान एक ते दोन तासांसाठी त्यांना दिल्ली विमानतळावर थांबविण्यात येईल.
Sep 1, 2013, 09:52 AM ISTअखेर आसाराम बापूंना अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना अखेर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जोधपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या इंदूर इथल्या आश्रमातून त्यांना अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी आसाराम यांची दिवसभर ड्रामेबाजी सुरू होती. त्यांच्या समर्थकांनी दांडगाई करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखत इंदूर आश्रमातून बापूंना ताब्यात घेतलं.
Sep 1, 2013, 07:54 AM ISTआसाराम बापूंच्या आश्रमावर हल्ला, भक्तांना मारहाण
राजस्थानच्या जोधपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंच्या नागपुरातील आश्रमात आज अज्ञात युवकांनी दगडफेक करत तोडफोड केली.
Aug 28, 2013, 08:43 PM ISTआसाराम बापूंना फासावर लटकवा, पीडित मुलीच्या वडिलांची मागणी
आसाराम बापू यांच्याकडून आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. या घटनेबद्दल घरी सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्धस्त करण्याची धमकी बापूंनी दिल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांच्या शिष्यांकडून केस मागे घेण्याबाबत आपल्यावर दबाव येत असल्याचंही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. आसाराम बापूंना अजूनपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Aug 28, 2013, 12:39 PM IST