पांड्याच्या सिक्सर चाहत्याला पडला महागात

टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन हार्दिक पांड्याने चौथ्या सामन्यातही दमदार कामगिरी केली. त्याने ४० बॉल्समध्ये ४१ रन्स केले. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

Updated: Sep 29, 2017, 08:44 PM IST
पांड्याच्या सिक्सर चाहत्याला पडला महागात

बंगळुरू : टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन हार्दिक पांड्याने चौथ्या सामन्यातही दमदार कामगिरी केली. त्याने ४० बॉल्समध्ये ४१ रन्स केले. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

हार्दिक पांड्याच्या बॅटमधून रन्सची बरसात होते आहे. टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा तो उचलत आहे. 

चौथ्या सामन्यात हार्दिकने ३ सिक्सर लगावले. ज्यातील एक सिक्सर स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकांसाठी चांगलाच महागात पडला आहे. पांड्या एक दमदार सिक्सर बाऊंड्री पार करत स्टेडियममधील तोसित अग्रवाल या प्रेक्षकाला लागला. तोसित हा बॉल कॅच करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो योग्य प्रकारे कॅच करू शकला नाही. बॉल त्याच्या ओठांवर आणि दातावर लागला. 

त्याला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, ‘त्याचा लोअर लिप्स आणि खालच्या दाताजवळ भेग पडली आहे. खालचा एक दात लूझ झालाय. त्याला बॉलच्या गतीचा अंदाज आला नसल्याने हे झाले. त्याला टाके लावण्यात आले आहेत’.